आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळकत करातून 20 कोटींची कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरकरांनी भरलेल्या मिळकत कराच्या रकमेपैकी 20 कोटी रुपये शहराच्या विकास कामांसाठी खर्च करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केलेले आहे. यातून नगरसेवकांच्या स्वेच्छा विकासकामांच्या निधीतून रखडलेली प्रभाग विकासाची कामे करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महापालिकेस नागरिकांच्या मिळकत करापोटी एकूण 32 कोटी रुपये संकलित झाले आहेत. नागरिकांकडून संकलित कर लोकहितासाठी कसा खर्च करायचा याचे नियोजन आयुक्त गुडेवार हे करत आहेत. सर्व प्रभागात सम-समान निधीचे वाटप करून विकासकामे करण्यात येणार आहेत. मार्चपूर्वी 20 कोटी मिळत असल्याने प्रभागातील कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांसाठी खुशखबर आहे.

गुडेवारांनी घेतला एलबीटीचा भार
स्थानिक संस्था कर (एलबीटी) व्यापार्‍यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने र्शी. गुडेवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलबीटी वसुली विभाग प्रमुख सुनील माने यांच्याकडून पदभार त्यांनी स्वत:कडे घेतला आहे. माने यांच्याकडे अद्याप कोणत्याही खात्याचा पदभार दिलेला नाही. ‘एलबीटी’ वसुलीसाठी गरज पडल्यास कडक कारवाईचे संकेत यापूर्वीच गुडेवार यांनी दिलेले आहेत. कर वसुलीसाठी व्यापार्‍यांची त्यांनी बैठक घेतली होती. कर भरून महपालिकेस सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले होते.

बेकायदा मजला पाडणार
होटगी रस्त्यालगत मोहिते नगरजवळ असलेल्या (पूर्वीच्या एन मार्ट) इमारतीचा वरील मजला बेकायदा असून तो महापालिका पाडणार आहे. संबंधितांना 24 तासांची नोटीस देण्यात आली आहे.

नगर रचना विभागात सह्यांचे फुटले पेव?
नगर रचना विभागाकडून अचानक काही फाइलमधील कागदांवर सह्या झालेल्या आहेत. त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कोणत्या फाइलमधील कागदांवर मागील तारखा टाकून सह्या केल्या का? यांची तपासणी होणार आहे.

विकासकामे करणार
नगरसेवकांना भांडवली कामांसाठी निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात विकास आणि नागरी सुविधांची कामे तातडीने सुरू होतील. ‘एलबीटी’ वसुली माझ्याकडे घेतली आहे. नगर अभियंता सुभाष सावस्कर यांनी खुलाशासाठी मागितल्याप्रमाणे आठ दिवसांची मुदत दिलेली आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका