आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis News In Marathi, Sushilkumar Shinde, Solapur, Divya Marathi

कापड सोडा, पोलिसांसाठी चादर तरी घेतली काय?,फडणवीस यांचा गृहमंत्री शिंदे यांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू, सोलापूर आणि यशवंत गिरण्या बंद पडल्या. कापड सोडा, शिंदे यांनी पोलिसांसाठी चादर तरी खरेदी केली काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. देशाचे पंतप्रधान दुबळे आहेत, प्रतिवाद करण्याची ताकद त्यांच्यात नाही. देशात काँग्रेसची सरकार असल्याने महागाई वाढते आहे. विरोधकांची सत्ता असताना महागाई वाढली नाही. त्यामुळे महागाई काँग्रेसचीच औलाद आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
रविवारी संध्याकाळी शिवस्मारकच्या मैदानात महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा झाली.
मंचावर आमदार प्रकाश शेंडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, आमदार विजयकुमार देशमुख, शहाजी पवार, मोहिनी पतकी, अनुजा कुलकर्णी, रामचंद्र जन्नू, प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकार्‍यांसह सुमारे दोन हजार नागरिक उपस्थित होते.
सोलापूर विद्यापीठास दर्जा नाही, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थी गेला तर व्हा बाजूला असे म्हणतात. चार महिने विद्यापीठाचे निकाल लावत नाहीत, अशी टीका केली.
16 रोजी काँग्रेसची अंत्ययात्रा
या निवडणुकीत काँग्रेसची मयत निश्चित आहे. त्यामुळे भाजप, रिपाइं, रासप, शेतकरी संघटना हे चार खांदेकरी असतील, असे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे म्हणाले. यावेळी मनसेचे देविदास बनसोडे, महेश सोमा, पद्माताई चिप्पा, अत्तार शेख आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
फडणवीस म्हणाले..
आताच्या पंतप्रधानांचे अस्तित्वच जाणवत नाही. ते बोलतच नाहीत.
पाकिस्तानी सैनिकांनी पाच जवानांचे मुंडके नेले तरी ते बोलले नाहीत.
कोळसा, हेलिकॅप्टर, टू जी आदी घोटाळे झाले तरी पंतप्रधान निष्क्रिय राहिले.
मनमोहनसिंग दुर्बल तर राहुल मोदींसमोर टिकाव न धरू शकणारे अशी स्थिती आहे.
आम्हाला चहा विकणारा पंतप्रधान चालेल पण देश विकणारा पंतप्रधान नको.
काँग्रेसने देशावर महागाई लादली. देश बदलण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे.