आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात १०० किलो चांदी, १६ लाख रुपये जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराच्या सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेला शहर जिल्ह्यातील भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या महिन्याभरात १०० किलो चांदी जमा झाली आहे. त्यामुळे लवकरच सुवर्ण सिद्धेश्वरची संकल्पना मूर्त स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेप्रसंगी दैनिक दिव्य मराठीने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराशी तुलना करत सुवर्ण सिद्धेश्वर मंदिराची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेचे सोलापूरकरांनी स्वागत केले होते. त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने मे रोजी पत्रकार परिषद घेऊन सुवर्ण मंदिर साकारण्याचा निर्धार व्यक्त केला. सोलापूर परिसरातील भाविकांना चांदी, सोने आणि रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. अवघ्या महिन्यातच १०० किलो चांदी, १५ तोळे सोने आणि १६ लाख देणगी स्वरूपात जमा झाले आहेत.
धर्मराज काडादी : लाख, शिवशरण दिंडुरे : लाख, सिद्धेश्वर मार्केट यार्ड कर्मचारी : लाख ४९ हजार ६६१, विद्याधर दोशी : लाख रुपये, गुंडप्पा कारभारी : ८३ हजार, आमदार रमेश कदम : ७५ हजार, प्रा. गजानन धरणे : ५४ हजार २००, गुरुराज स्वामी : ५१ हजार, सिद्धेश्वर साखर कारखाना : ५० हजार, सिद्धेश्वर कारखाना पतसंस्था : ५१ हजार, अॅड. मल्लिनाथ पाटील : ५१ हजार, डॉ. विजय कानेटकर : ५० हजार, बसवराज मैंदर्गीकर : ४१ हजार, शंकर भोगशेट्टी : ४१ हजार, एस. ए. माळी मार्केटिंग सर्व्हिसेस : ४१ हजार, बसवराज निंबर्गी : ४० हजार, दैनिक संचार कर्मचारी वृंद : ३७ हजार ८२०, चंद्रशेखर येली : ३७ हजार २००, नागेश व्यंकटराव : ३० हजार, कादंबरी निंबर्गी : २७ हजार २००, बसवराज निंबर्गी : २७ हजार २००, स्वान कलेक्शन : २१ हजार १०१, मल्लिनाथ हिरेमठ : १९ हजार ७५०, चंद्रलेखा कारंजे : ११ हजार, मीनाक्षी कारंजे : ११ हजार, बसवराज बिराजदार : ११ हजार १११, आण्णाराव भोपळे : ११ हजार, सुभाषचंद्र खैराटे : ११ हजार १११, अक्षय कारंजे : ११ हजार
एक किलो त्यापेक्षा अधिक चांदी दिलेले दानशूर भक्त
विकास तंबाके, पद्मश्री शेटे, श्रीमती कस्तुरबाई चडचणकर, अल्लमप्रभ्ू अंबिका खुबा, शिवशंकर भोगडे, श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट, सुरेश मैंदर्गीकर, रेवणकर बंधू परिवार, उत्तम पाटील, सुशीलाबाई मल्लिकार्जुन वाकळे, मल्लिकार्जुन तालीकोटी, सोमशेखर हिरेमठ, सोलापूर शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, अॅड. बाळासाहेब नवले, बोरामणी ग्रामस्थ मंडळी, नीलकंठ सहकारी बँक, सोमशंकर देशमुख, नगरसेवक जगदीश पाटील, अशोक जैन.
बातम्या आणखी आहेत...