आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तथागतांच्या प्रसन्न मूर्तींनी वेधले मिरवणुकीत लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह लाखो लोकांनी बौद्धधम्म स्वीकारल्यानिमित्त 57 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. शहारात मिरवणुका, फेरी काढण्यात आल्या. काही सामाजिक संस्थांनी वाहनावर तथागतांच्या प्रसन्न शिल्पांसह देखावा केला होता. डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून आंबेडकरी जनतेचे येणे सुरू झाले होते. सायंकाळनंतर गर्दी वाढली.

सामूहिक बुद्धवंदना
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने धम्मगंध बुद्धविहार येथे सकाळी सहा वाजता बुद्ध वंदना व सत्र पठणाचा कार्यक्रम झाला. सकाळी 11 वाजता मिरवणुकीस मातोर्शी रमाबाई आंबेडकर नगर येथून सुरुवात झाली. नव्या पेठेतील जुन्या नगरपालिकेतील क्रांतिसूर्य जोतिराव फुले व डॉ. आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या
सीएम ग्रुपतर्फे पथनाट्य, पर्यावरण बचाव, महिलांवरील होणारे अत्याचार, स्त्रीभ्रूण आदी देखावे सात रस्ता येथील परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमास महापौर अलका राठोड, राजा इंगळे, तौफिक शेख, प्रवीण सोनवणे, समीर शेख आदी उपस्थित होते.

‘जीएम’तर्फे रॅली
जी.एम. संस्थेने 11 बौद्ध भिख्खुंना चीवरदान करून धम्म शांती रॅली काढली. पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, सुभाष बुरसे यांच्या हस्ते सुरुवात झाली. संस्थापक बाळसाहेब वाघमारे, नीलकंठ बँकेचे संस्थापक विश्वनाथ करवा, पोलिस निरीक्षक अरुण वायकर, सिध्देश्वर बँकेचे संचालक प्रकाश वाले, गिरीश कनेकर आदी उपस्थित होते. यात 1000 युवकांनी हातामध्ये पंचशील ध्वज घेतले होते.

मुली वाचवा संदेश
भीमगर्जना युथ पॉवर संस्थेने मुली वाचवा, भ्रष्टाचार या विषयावर रॅली काढली. संस्थापक अध्यक्ष संजय हरिजन, अध्यक्ष विजय हरिजन, अप्पा गायकवाड यांच्यासह 250 जणांनी भाग घेतला.
खाऊ वाटप
उपमहापौर हारुण सय्यद , महेश गादेकर यांच्या हस्ते खाऊ वाटप झाले. अर्जुन बाबरे, सुदर्शन कांबळे, प्रभाकर व्होनकळस, संजय गजघाटे, राकेश नागटिळक आदी उपस्थित होते.