आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धम् शरणम् गच्छामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवारी आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला होता. शिवाय सार्वजनिक मंडळांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढून शांतीचा संदेश दिला.

जी. एम. संस्थेच्या वतीने शांतीरॅली काढण्यात आली. या वेळी पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, सुभाष बुरसे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मिरवणुकीतील क्षण

पन्नासपेक्षा जास्त मंडळांचा सहभाग

शिस्तबद्ध मिरवणूक लेझीम संघात युवक - युवतींचाही सहभाग

निळा गुलाल, निळा गमजा घेऊन जय भीमचा गजर करीत जल्लोष

भव्य बुद्धमूर्ती आणि रंगीत रोषणाई ठरले आकर्षण

अभिवादनासाठी डॉ. आंबेडकर चौक भीमलेकरांनी फुलला