आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म. फुले सूतगिरणीवर ढोबळे गटाचेच वर्चस्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वाघोली येथील महात्मा फुले सहकारी सूतगिरणीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी माजी मंत्री ढोबळे गटाने वर्चस्व कायम राखले. निवडणूक लागलेल्या सात जागा ढोबळे गटाने जिंकल्या. आधी बिनविराेध झालेल्या दहा जागांपैकी आठ जागा ढोबळे गटाने मिळवल्या होत्या. त्यामुळे विरोधी आमदार रमेश कदम यांच्या परिवर्तन पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
सूतगिरणीच्या १७ पैकी सात जागांसाठी ५७ टक्के मतदान झाले होते. त्याची बुधवारी (दि. १) येथे मतमोजणी झाली. मतदारसंघनिहाय दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते : कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी : माळशिरस मोहोळ : विद्यमान अध्यक्ष अभिजित ढोबळे (५५२), ज्ञानदेव कांबळे (६२). भूम लोहारा : दिलीप तेलंग (३१३), बबन गायकवाड (६२).
तुळजापूर, उमरगा उस्मानाबाद : सुभाष पाटोळे (४०७), अशोक जाधव (६०). अक्कलकोट : अर्जुन आगवणे (२१७), विकास नारायणकर (११). दक्षिण उत्तर सोलापूर : मुकुंद िशंदे (५३०), भागवत देवकुळे (२९). महिला प्रतिनिधी : पुष्पा कांबळे (३७९४), मनीषा कांबळे (३८४१), वंदना कांबळे (२४१), रुक्मिणी देवकुळे (२५६).

दुपारी अडीचपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर झाला. दरम्यान, सुरुवातीपासूनच सत्ताधारी ढोबळे गटाचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत उत्साह होता. मतमोजणीनंतर ढोबळे समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मारुती बोरकर सहायक म्हणून बी. आर. माळी यांनी काम पाहिले.

टीकाआणि गुन्ह्यांमुळे गाजली निवडणूक
विधानसभेच्यािनवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आमदार रमेश कदम यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यातूनच वाघोली सूतगिरणीच्या निवडणुकीची ठिणगी पडली. कदम यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सूतगिरणीतील सत्ताधारी ढोबळे यांना आव्हान दिले. बिनविरोध झालेल्या दहापैकी आठ जागा मिळवून ढोबळे गटाने आपली ताकद दाखवली तरी उर्वरित सात जागांच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप, हाणामारी आणि एकमेकांविरोधात दाखल केलेले गुन्हे यामुळे ही निवडणूक गाजली आणि जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.

निकालानंतरपरतताना अपघात, सात जखमी
निवडणूकिनकाल ऐकून वाघोलीकडे निघालेल्या जीपची ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास परमेश्वर पिंपरीजवळ हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.