आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धूम बाइकस्वारांचा उच्छाद; तरुणींना होतो नाहक त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. मुख्य रस्त्यांवर दुचाकी वाहनांची गर्दी वाढतेय. त्यातून काही तरुणांनी धूम स्टाइलने बाइक चालवत उच्छाद मांडला आहे. यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. महिला, तरुणी, विद्यार्थिनी यांनाही त्रास होतोय. या धूम बाइकस्वारांना ‘ब्रेक’ लावण्याची गरज आहे.

अनेक तरुणांकडे वाहनपरवाना नाही, दुचाकीची कागदपत्रे नसतात, ते ट्रीपल सीट बसून जातात. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा जाब विचारल्यानंतर तेच तरुण शिवीगाळ आणि मारहाणीला उतरतात, असा अनुभव अनेकांना येत आहे.

पोलिसांनी शाळा, महाविद्यालय परिसरात मुख्य रस्त्यांवर बॅरीकेडिंग लावून दुपारी, सकाळी अचानक मोहीम घेतल्यास धूम बाइकस्वारांना ‘बे्रक’ लागेल. या तरुणांवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. त्यासोबत त्यांच्या पालकांना वाहतूक पोलिसांनी ठाण्यात बोलावून मुलाचा प्रताप कानावर घालण्याची गरज आहे. अशी कारवाई यापूर्वी वाहतूक पोलिसांनी केली होती. त्यात आता खंड पडला आहे.
डफरीन व सिव्हिल चौक पोलिसांच्या रडारवर
तेरा सिग्नल चौकांपैकी दोन चौकात एक महिना सलग विशेष कारवाई मोहीम राबवण्याचे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे. शनिवारपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. सायंकाळी व सकाळी या चौकात दोन पोलिस अधिकारी, दहा कर्मचारी थांबून कारवाई मोहीम घेतील. ट्रीपल सीट, ओव्हरसीट, वाहन कागदपत्रे तपासणी आदी वाहतूक नियमांबाबत कारवाई व जनजागृती होणार असल्याचे अत्राम म्हणाले. प्रत्येक चौकात एक महिना सलग ही कारवाई राहील.
शनिवारचा एक अनुभव
सातरस्ता परिसरात दोघा तरुणांना एका वाहनधारकाने साइड न दिल्याने दुचाकीवरील तरुण त्याचा पाठलाग करून शिवीगाळ करताना आढळले. दुचाकीवरूनच त्यांना लाथ मारण्याचा प्रयत्नही केला. अशा घटनांना पोलिसांनी चाप लावण्याची गरज आहे.
आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावणार
वाहनपरवाना नाही, ट्रीपल सीट जातात, वाहनांची कागदपत्रे नाहीत असे तरुण कारवाईत सापडल्यानंतर दंडात्मक कारवाई तर होणारच. त्यासोबत आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन समज देण्यात येणार आहे. किमान यामुळे तरी मुलांना शिस्त लागेल.’’
मोरेश्वर अत्राम, साहाय्यक पोलिस आयुक्त,
वाहतूक शाखा, सोलापूर