आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल फलकावर पडलाय सोलापूर महापालिकेचा प्रकाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सात रस्ता येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा डिजिटल फलक लावण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी फलक दिसावा म्हणून हॅलोजन बल्बच्या माध्यमातून फलकावर प्रकाशही टाकण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या हॅलोजन बल्बसाठी याठिकाणीच असलेल्या महापालिका परिवहन कार्यालयातून वीज घेण्यात आलेली आहे.

पाहणी करून केली जाईल कारवाई
डिजिटल फलकाबाबत माहिती नाही. प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी लागेल. परिवहन बस डेपोच्या कार्यालयातून कनेक्शन घेतले असल्यास ते चुकीचे आहे. याबाबत पाहणी करून दोषींवर कारवाई करू.
- ए. ए. पठाण, परिवहन व्यवस्थापक

फोकस आम्ही लावला नाही
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावर हा फोकस लावण्यात आला होता. तो आम्ही लावला नाही ’ - -पुरुषोत्तम बरडे, शिवसेना सह संपर्क प्रमुख