आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Mane Rally Issue At Solapur, Divya Marathi

विश्वासाने साथ द्या, दगाबाजी करू नका , आमदार दिलीप माने यांचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - आमदारगावात येत नाहीत, असा विरोधक आरोप करीत आहेत. पण ज्यांना ज्यांना शब्द दिला त्यांची कामे केलीत. शब्दाला जागणारा मी आहे. मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या. मंद्रूप गावच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न नक्कीच सोडवेन असे आश्वासन आमदार दिलीप माने यांनी दिले.

मंद्रूप गावातील रस्ते, सभामंडप इतर कामांचा प्रारंभ आमदार माने यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती गोपाळराव कोरे होते.
आमदार माने म्हणाले, "मी कमी बोलतो पण कामे जास्त करतो. पण त्याचा गाजावाजा कधी केला नाही. मंद्रूप गावात ४० ते ५० लाखांची कामे केली. कोरडवाहू शेती योजनेतून कोटी मंजूर झालेत. सीना नदीला पाणी मिळावे यासाठी सतत पाठपुरावा केला. उपोषण केले. यापुढे माझे आंदोलन हे सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळवणे भीमा नदीवर बंधारा बांधण्यासाठी असेल. मी आमदार म्हणून प्रामाणिकपणे कामे केली. मंद्रूपच्या पाणीप्रश्नासाठी गोपाळ कोरे रमेश नवले माझ्याकडे आले. हा प्रश्न लवकर सोडविण्याचा माझा प्रयत्न सुरू आहेत.' बाजार समितीचे संचालक प्रवीण देशपांडे यांनी आमदार माने यांनी मंद्रूप गावासाठी दिलेल्या निधीची कामांची माहितती दिली. तसेच मंद्रपूचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माने यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंडा यांनी मोठी-मोठी भाषणं ठोकणारे पुढारी कधी कामे करीत नसल्याचे सांगून आमदार माने यांनी तालुक्यात अनेक कामे केली. त्यांच्यापर्यंत आलेल्यांना त्यांनी कधीच परत पाठवले नसल्याचे सांगितले. या वेळी धनंजय म्हेत्रे, हुसेनशहा मकानदार, अिनल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.