आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Mane Selected As A Agricultural Produce Market Committee Chairperson

दिलीप मानेंची "राजकीय वापसी', बाजार समितीची सूत्रे ताब्यात, १५ संचालकांनी दिला कौल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणेच माजी आमदार दिलीप माने यांची मंगळवारी एकमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सकाळी सभा झाली. त्यासाठी १५ संचालक उपस्थित होते. सभापतिपदाचा राजीनामा दिलेल्या राजशेखर शिवदारे यांच्यासह चार संचालक मात्र अनुपस्थित होते.
श्री. माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा श्री. पवार यांनी सव्वाअकरा वाजता केली. त्यानंतर बाजार समिती आवारात एकच जल्लोष झाला. रंगांची मुक्त उधळण झाली. समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचे पडसाद बाजार समितीत उमटले. त्याला शह देण्यासाठी श्री. शिवदारे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्याला सामोरे जाता शिवदारेंनी पदाचा राजीनामा दिला. हा सारा प्रकार घडवून आणण्यात माने समर्थक संचालकांचा सहभाग होता. त्यामुळे सभापतिपद माने यांनाच मिळाले. निवड झाल्यानंतर श्री. पवार आणि सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी माने यांचे अभिनंदन केले. यावेळी माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत : संचालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही म्हणून माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला. (राजीनामा देताना माजी सभापती राजशेखर शिवदारे म्हणाले होते.)

अपेक्षा करू पूर्ण

संचालकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला. बाजार समितीच्या प्रगतीसाठी सर्वांना घेऊन काम करू. संचालकांच्या अपेक्षा पूर्ण करू. दिलीपमाने, नूतन सभापती

सभापतिपदाची निवडणूक होताच माजी आमदार विश्वनाथ चाकोते आले. त्यांनी माने यांचा फेटा बांधून सत्कार केला. त्यांचे सिद्धेश्वर सहकारी बँकेतील संचालकपद शिवदारे यांनी रद्द करायला लावले. त्यामुळे शिवदारेंना सभापतिपदावरून खेचण्यात त्यांनीही हातभार लावला होता.

हे होते अनुपस्थित :स्वत:शिवदारे, बसवराज दुलंगे, सिद्धाराम चाकोते, केदार विभूते
हे संचालक होते : चंद्रकांत खुपसंगे, गजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सोजर पाटील, इंदुमती अलगोंडा, शांताबाई होनमुर्गीकर, उत्तरेश्वर भुट्टे, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, नसीर खलिफा, हकीम शेख, सिद्रामप्पा यारगले उपस्थित होते.