आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजूरमध्ये माने यांचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ जयश्री माने यांनी राजूर गावचा दौरा केला. माजी सभापती जगदेवी देवकते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाजीराव बुळगुंडे, लक्ष्मण बनसोडे यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. राजूर गाव वर्षानुवर्षापासून काँग्रेस सोबत राहिले आहे.
यंदाही काँग्रेसलाच मताधिक्य देईल. आमदार माने यांनी तालुक्यात चांगले काम केले आहे. विरोधात कोणताही उमेदवार असला तरी आमची नाळ काँग्रेसशी जोडली असल्याचे राजू देवकते यांनी सांगितले. यावेळी कृष्णाप्पा बिराजदार, राजशेखर पाटील, लक्ष्मण गडदे उपस्थित होते. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेलबरूर, संजवाड, बिरनाळ, हत्तरसंग, कुडल येथे ग्रामस्थांची गर्दी होती. या भागातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यासाठी निधी प्रस्तावित असल्याने प्रश्न सुटेल असे जयश्री माने यांनी सांगितले.