आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात मद्यपींवर कारवाई करण्यात ‘उत्पादन शुल्क’ची कुचराई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील अंडा ऑम्लेट, चायनीज, भजी, सोडा वॉटर आदी गाड्यांवर मद्यपींचा वाढता वावर थांबण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. विभागाच्या पोलिसांनी केवळ औपचारिक पाहणी केली. गाड्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हातगाड्यांवर मद्यपींचा सुळसुळाट दिसत आहे. याबाबत दिव्य मराठीने रविवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोमवारी उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी काही भागातील गाड्यांची पाहणी केली. परंतु त्यांना काहीही आढळून आले नाही. पोलिस येणार याचा अंदाज आल्याने दोन दिवस तो प्रकार बंद होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एक दोन दिवस कारवाई आणि नंतर जैसे थे, असे सुरू आहे. परिणामी भर रस्त्यावर हातगाड्यांवरून अवैध व्यवसाय सुरू आहे. मद्यपींच्या गर्दीने सामान्य नागरिकांनाही त्रास होत आहे. काही ठिकाणी तर दुकाने बंद झाली की त्या दुकानासमोरील पदपथाचा पुरेपूर वापर होतो आहे. पोलिसांचा धाक तळीरामांवर नसल्याचे दिसून येत आहे.