आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diraj Sarvade Elected For Kumar Kesari Competition

कुमार केसरीसाठी धीरज सरवदेची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र केसरीसाठी गादी विभागात गोपीनाथ घोडके माती विभागात आतिश मोरे या भगवा आखाड्याच्या मल्लांची निवड करण्यात आली.

सिद्धेश्वर आखाड्यात झालेल्या या चाचणी स्पर्धेतून कुमार केसरीसाठी लाल आखाड्याचा धीरज सरवदे सोलापूरचे प्रतिनिधीत्व करेल. याचे उद््घाटन पैलवान बाबू सुरवसे यांनी केले. या वेळी दत्तात्रय लोणारी, मारुती सुरवसे, दिलीप शेळके, नामदेव लोणारी आदी उपस्थित होते. सुरुवातीस महाराष्ट्र केसरी पैलवान इस्माईल शेख, कांेडिबा सरवदे यांच्या िनधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. शिवाजी परळकर, महेश कोळी, धनराज भुजबळ, अमर दुधाळ, विठ्ठल कलागते, विश्वनाथ बारसे आदींनी पंच म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेेतून विजयी मल्लांची पुणे येथे २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कुमार केसरीसाठी तर नगर येथे २५ ते२८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे तालीम संघाचे अमर दुधाळ भरत मेकाले यांनी सांगितले.

निवडलेले मल्ल असे
महाराष्ट्रकेसरी : गादीमाती विभाग याप्रमाणे : ५७ किलो : दिनेश जाधव (भगवा), रोहित इगवे (केगाव) ६१ : राहुल हेगडे (श्रीकृष्ण), विजय भोसले (लाल), ६५ : स्वप्निल काशीद, गणेश जाधव (भगवा), ७० : ईश्वर सरवदे (लाल), बाळू गायकवाड (श्रीकृष्ण), ७४ : िकरण जाधव (श्रीकृष्ण), अतुल इगवे (केगाव), ८६ : श्याम भोसले, रणवीर चौगुले (लाल), ९७ : अर्जुन साठे (श्रीकृष्ण), किशोर सरवदे (लाल), महाराष्ट्र केसरी : गोपीनाथ घोडके , आतिष मोरे(भगवा).
कुमारकेसरी : ४२किलो : सौरभ इगवे (केगाव), ४६ : सिद्धेश्वर गायकवाड (देगाव), ५० : रामसिंग रजपूत (श्रीकृष्ण), ५४ : रोहित इगवे (केगाव), ५८ : दिनेश जाधव (भगवा), ६३ : स्वप्निल काशिद (भगवा), ६९ : नागनाथ िशंदे (केगाव), ७६ : आकाश ढेरे (श्रीकृष्ण), कुमार केसरी : धीरज सरवदे (लाल).

सिद्धेश्वर आखाड्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत ६५ किलो गटातील अमर चौगुले संतोष सारंग यांच्यातील क्षण.