आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरहून थेट जम्मू गाठणे होणार शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार घेतल्यापासून गुलबर्गा रेल्वेस्थानक रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर अधिक गडदपणे झळकू लागले आहे. गुलबर्ग्‍याहून तीन नव्या गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. त्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

रायचूर, यशवंतपूर (बंगळुरू) व कटरा (जम्मू) साठी या गाड्या असतील. यापैकी कटाराची गाडी व्हाया सोलापूरहून जाणार आहे. त्याचा फायदा सोलापूरला होईल. सोलापूर थेट जम्मू व काश्मीरशी जोडले जाईल. गुलबर्गा रेल्वेस्थानकाचाही कायापालट करण्यासाठी ते अनेक प्रवासी सुविधा गुलबर्गा स्थानकावर मंजूर करणार आहेत. यात पादचारी पूल, इस्सेलेटर (सरकता जिना), पार्किंगच्या सुविधा, आरक्षण केंद्र आदी बाबींचा समावेश आहे. तसेच येत्या काही दिवसांत नव्या गाड्यादेखील सुरू होऊ शकतात. कोणत्या गाड्या कोणत्या मार्गावर सुरू कराव्यात, याचा अभ्यास व चाचपणी रेल्वे मंत्र्यांकडून सुरू आहे.