आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Direction Of Community Through Media,Latest News In Divay Marathi

माध्यमे समाजाला दिशा देतात- श्रीपाद जोशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माध्यमे ही समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे माध्यमांच्या क्षेत्रांत कार्य करणार्‍या पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, नागपूर विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख जोशी (नागपूर) यांनी आज येथे केले.
सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील पत्रकारिता विभागात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन झाले, तीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माध्यम लेखन हा कार्यशाळेचा विषय होता. अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार होते. पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, अर्थशास्त्न विभागप्रमुख डॉ. सी. एस. भानुमते, डॉ. जी. एस. कांबळे, प्रा. प्रकाश व्हनकडे, प्रा. प्रभाकर कोळेकर, प्रा. अंबादास भासके, प्रा. सोनाली गिरी, प्रा. ज्ञानेश्वरी हजारे, रमेश पवार, दीपाली पाटील आदी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, जे नावीन्यपूर्ण आहे ते बातमीच्या स्वरूपात लोकांसमोर मांडणे हे कार्य वृत्तपत्र करीत आले आहेत. बातमीत आपली मते न घुसडता वस्तुनिष्ठ बातमी देणे अपेक्षित आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोककुमार म्हणाले की, माध्यमांचा अभ्यास सर्वांसाठी आवश्यक आहे. लेखन कौशल्ये पदोपदी उपयोगी पडतात. प्रारंभी डॉ. चिंचोलकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पत्रकारितेचा अभ्यासक्रम व प्रत्यक्ष पत्रकारिता यातील फरक पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.’
आज चित्रवाणी लेखनाबाबतचे सत्र
माध्यम लेखन या विषयावर आयोजित ही कार्यशाळा तीन दिवसीय असून कार्यशाळेत गुरुवारी चित्रवाणीच्या लेखनाबाबत शिवकुमार पाटील हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी नभोवाणी लेखनाबाबत आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ तसेच आर. जे. पल्लवी- गंभिरे या मार्गदर्शन करणार आहेत.
सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्रीपाद जोशी. यावेळी संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार, डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. सी. एस. भानुमते, डॉ. गौतम कांबळे आदी.