आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी मंडळ संचालक नलवडे यांचा राजीनाम, वैयक्तिक कारण असल्याची दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. प्रशांत नलवडे यांनी राजीनामा दिला. जून २०१५पर्यंत त्यांची मुदत होती. ही धुरा जून २०१३ मध्ये हाती घेतली होती. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात ते सेवारत आहेत. वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
नलवडे यांच्या काळात दोन युवा महोत्सव झाले. त्यावर वादाची छाया उमटली. पहिल्याच वर्षी वडाळा येथील लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात झालेल्या महोत्सवास हाणामारीच्या घटनेचे गालबोट लागले. वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी निकालावर नाखूष होते. त्यांनी निषेधाचा सूर आळवला. पुढे वर्षभर त्यांनी मंडळाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. उशिरा का होईना, समेट घडवून विद्यार्थ्यांचे मन वळविण्यात नलवडे यांना यश आले. परिणामी पुढील महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका त्यांच्या काळात झाल्या. या निवडणुकीत विद्यापीठ बाह्य घटकांचा प्रभाव त्यांना रोखता आला नाही. निवडीची पारदर्शक पद्धती बंद खोलीत पार पडत होती. या प्रक्रियेची माहिती घेण्यापासून त्यांनी पत्रकारांनाही दूर ठेवले. इंद्रधनुष्य महोत्सव, पश्चिम विभागीय, राष्ट्रीय महोत्सव यात चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा दिला
- वैयक्तिक अडचणी, महाविद्यालयाची अडचण पाहून तसेच पुढील संचालक निवडीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी स्वत:हून राजीनामा दिला. दोन वर्षांच्या काळात कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी कार्य करण्यासाठी मोकळीक दिली. विद्यार्थ्यांसाठी काही करता आले. पुढे अजूनही करायचे आहे आणि करत राहीन.”
प्रा.डॉ. प्रशांत नलवडे, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ
बातम्या आणखी आहेत...