आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंग होमकर जिद्दीने उभा राहिला दोनच वर्षांत !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रोपडान्स(दोरीनृत्य) करताना पूर्ण शरीर विकलांग. पण खंबीर मन आणि कुशाग्र बुद्धीच्या बळावर डॉ. ज्ञानराज होमकरने नियतीवर विजय मिळवला. अवघ्या दोन वर्षांतच स्वबळावर उभा राहिला. या प्रेरणादायक जिद्दीचा प्रवास रविवारी सोलापूरकरांसमोर त्याने उलगडला. निमित्त होते फेब्रुवारी २०१३ च्या अपघाती क्षणाचे.

याच दिवशी तो अपघात ज्ञानराजच्या कपाळी लिहिला गेला. मग आयुष्यालाच कलाटणी मिळाली. पण जिद्दी मनाने पुन्हा उभारी घेतली. रविवारी स्वत: बनवलेल्या संकेतस्थळाचे त्याने दिमाखात उद््घाटन केले. नव्या जोमाने, उमेदीने पुढील आयुष्य साकारण्याचा मनोदयही सांगितला. फडकुले सभागृहात सुनीता तारापुरे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांची संघर्षकहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

तोजीवघेणा अपघात :
बारावीनंतरनाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात बीएएमएस अभ्यासक्रमास प्रवेश. चार वर्षे उत्साहात गेली. अनेक स्पर्धा गाजवल्या. परीक्षाही संपली. निरोपाच्या स्नेहसंमेलनात रोपडान्स (दोरीनृत्य) करताना अचानक काय झाले ते ज्ञानराजला कळलेच नाही. दोरीच्या वरच्या टोकावरून तो स्टेजवरच कोसळला. पूर्ण बेशुद्ध.

आताव्हीलचेअर कायमची सोबती
१५दिवस कोमात होता. जाग आली ती वेदनांच्या कल्लोळात. पूर्ण शरीर विकलांग झालेले. बोटही हलवता येत नाही. मज्जातंतू तुटल्याने शरीराचाच लोळागोळा झालेला. कसेबसे बोलता येऊ लागले. शरीराच्या इतर भागावरील उपचार थकले. कित्येक नामांकित रुग्णालये पालथी घातली. अनेक शस्त्रक्रियांनंतरही व्हीलचेअरच कायम सोबतीला आली. डॉ. ज्ञानराज घरी परतला. पण मानेखालील शरीरावर कोणताही कंट्रोल नाही. वैद्यकीय उपचारही थांबलेत. आता झाेपेत आणि संगणक विश्वात मग्न.

हीअशी संघर्षाची कहाणी : दोनवर्षात ज्ञानराजच्या मनाने उभारी घेतली. कुटुंब आणि मित्रांची साथ होतीच. हा खूप कठीण काळ होता. पण त्याने हार मानली नाही. खंबीर मनाने तो पुन्हा सिद्ध झाला. सध्या तोंड हा एकमेव अवयव नियंत्रणात आहे. त्याचेच त्याने हात बनविले.
ज्ञानराजचे वडील राजकुमार, आई शैलजा, भाऊ शाहीराज, बहीण राही होमकर-आरशिद, नितीन आरशीद, मित्र डॉ. सर्वेश चिवटे आदी मित्रांची सदैव साथ असते. मोटीव्हेशन इव्हेंटमध्ये सक्रिय होण्याचा मनोदय आहे.

आता साकारणार तो स्वप्ने ....
अल्पावधीतच संगणक स्थळ विकसित
स्वत:पाणी पिण्यासाठी त्याने खास बाटली बनवलीय. संगणक मोबाइल हाताळण्यासाठी तोंडी धरता येणारी सेन्सर स्टीक तयार केलीय. अल्पावधीतच संगणकावर अकरावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीचे संकेतस्थळ (www.drdrh.in) विकसित केले. त्याचे उद्घाटन रविवारी झाले.
ज्ञानराज होमकर यांची प्रकट मुलाखत वेबसाइट उद्घाटन