आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल, गॅसच्या किमती वाढतच जातील : पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - डिझेल, अन्नधान्ये, खते, गॅस आदीवर दरवर्षी साडेचार लाख कोटींचे अनुदान द्यावे लागते. देशाचा विकास दर वाढवण्यासाठी विजय केळकर समितीने हे अनुदान हळूहळू कमी करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या घटकांच्या किमती वाढतच राहतील, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डिझेल दरवाढीचे समर्थन केले.
अकलूज येथे दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी आलेले पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्राला दरवर्षी डिझेलवर 1 लाख कोटी, खतांवर 1 लाख 40 हजार कोटी, अन्नधान्यावर 1 लाख 20 हजार कोटी गॅस सिलिंडरवर 12 हजार कोटी रुपये असे सुमारे साडेचार लाख कोटी अनुदान द्यावे लागते.

प्रसंगी पाणी विकत घेऊ
पवार म्हणाले, यापूर्वी आपण कर्नाटकाच्या विनंतीवरून त्यांना पिण्यासाठी पाणी दिले आहे. आता आपल्याला पाण्याची गरज आहे. या संदर्भात आपण स्वत: व मुख्यमंत्री चव्हाण कर्नाटक सरकारशी बोललो आहोत. काहीतरी तोडगा निघेल. वेळ पडली तर पाणी विकत घेऊ, पण पाणीटंचाई जाणवू देणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत उपलब्ध पाणी पिण्यासाठीच राखून ठेवण्यात येईल. उजनीतून सध्या भीमा-सिना नदीत अनुक्रमे 4.5 व 1.5 टीएमसी पाणी सोडले आहे. मार्चमध्ये एवढे पाणी आणखी सोडले जाईल.