आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Distance Of Mukhadarshana Of Vitthala Will Be Less

विठ्ठल -भाविकांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न, मुखदर्शन जवळ नेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनरांगेतील गर्दी कमी होण्यासाठी सध्याच्या ठिकाणापेक्षा मुखदर्शन व्यवस्था आणखी जवळ नेता येईल का, या संदर्भात सध्या विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच श्री विठ्ठल मंदिरास भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे म्हणाले, श्री विठ्ठलाच्या पददर्शन रांगेतील भाविकांची गर्दी कमी होण्यासाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सध्याच्या ठिकाणापासून आणखी जवळून कसे होईल याची सध्या मंदिरात पाहणी केली जात आहे. मुखदर्शन आणखीन जवळून मिळाले तर भाविकांची पददर्शनाची रांग निश्चित कमी होण्यास मदत होईल. पददर्शनाची रांग लांब असेल तर भाविकांना चांगल्या प्रकारे श्री विठ्ठलाचे मुखदर्शन झाल्याचे समाधान मिळू शकेल. त्यामुळे अशा प्रकारे मुखदर्शन कसे सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने विचारविनिमय सरू आहे. यात्रा काळात नाशिक तसेच मराठवाडा विभागातून आलेल्या वाहनांच्या पार्किंगची सोय नवीन पुलाजवळ तसेच जुन्या दगडी पुलाजवळ झाली तर भाविकांना शहरात येण्यासाठी फार पायी चालावे लागणार नाही. त्यामुळे या दृष्टीने व्यवस्था करता येईल याची चाचपणी केली जात असल्याचे मुंढे म्हणाले.

जाहिरातीतून करणार मार्गदर्शन
वारी काळात तिन्ही बसस्थानकांवरून भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातींचा वापर केला जाणार आहे. कोणत्या गाड्या कोणत्या बसस्थानकावरून सुटणार याची २४ तास उद्घोषणा करण्यात येईल. त्यामुळे परगावच्या भक्तांना आपल्या गावची एसटी कोठे आहे याची माहिती मिळेल.

यात्रा काळात दाेन बसस्थानके, राज्यातून ३३५० गाड्या साेडणार
सोलापूर | आषाढी एकादशी ताेंडावर येऊन ठेपली असून भक्तांसह प्रशासनाला आता पंढरीच्या वारीचे वेध लागले आहेत. पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही जोरदार तयारी केली आहे. पंढरपूर येथे दोन नवे बसस्थानके सुरू करण्यात येणार आहेत. पंढरपूरसाठी राज्यभरातून सुमारे ३ हजार ३५० एसटी गाड्या सोडण्यात येतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोनशे अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी पुण्यातील भोसरी येथील एसटीच्या प्रशिक्षण केंद्रात परिवहनमंत्री दिवाकर रावते व परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बसस्थानकातून ६०० गाड्यांचे नियोजन गुरसाळे गावाजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात नवीन बसस्थानक असणार आहे. शनिवारपासून याचे काम सुरू हाेईल. सुमारे ६०० गाड्यांचे ऑपरेशन येथून हाेणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नगर येथून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांसाठी या स्थानकाचा वापर केला जाणार अाहे.

खासगी वाहनांना ‘शटल’चा पर्याय
भीमा व विठ्ठल कारखान्याच्या बसस्थानकावर भाविकांना पोहोचण्यासाठी व तेथून येण्यासाठी एसटीकडून खास शटल बससेवा असणार आहे. त्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. शटल बससेवेमुळे भाविकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा प्रवास सुरक्षित व कमी पैशात होणार आहे. खासगी वाहतूकदारांना चांगलाच चाप बसणार आहे.