आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांसाठी पंढरीत मॉल,यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पंढरपूर येथे मोठा मॉल उभारण्यात येईल. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार असून सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने शासनाकडून निधी मिळवण्यात येईल, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जयमाला गायकवाड यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी रंगभवन चौकातील वोरोनोको प्रशालेच्या मैदानावर भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद््घाटन अध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी अध्यक्षस्थानी होते. या वेळी जि.प.चे उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, कृषी सभापती पंडित वाघ, शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभू जाधव, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत आदी उपस्थित होते.
महिलांना आधार : बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याने कुटुंबासह समाजातही त्यांना सन्मानाची वागणूक मिळते आहे, असे गायकवाड म्हणाल्या कर्देहळ्ळीतील पद्मजादेवी मोहिते-पाटील बचत गटाला जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पालकमंत्री, महिला सभापतींची गैरहजेरी
महिलाबचत गटाच्या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आयोजिले होते. त्यासाठी झेडपी प्रशासनाने संपूर्ण जय्यत तयारी केली होती. परंतु ऐनवेळी पालकमंत्री देशमुख यांनी महत्त्वाचे वैयक्तिक काम असल्याचे कारण पुढे करीत कार्यक्रमास येणे टाळले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाच्या उद््घाटन कार्यक्रमाकडे महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुकेशिनी देशमुख यांनी पाठ फिरवली. तसेच, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना निकंबे या कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लगेच निघून गेल्या. बचतगटासारख्या महत्वाच्या कार्यक्रमात दोन्ही महिला सभापतींनी प्रदर्शनाकडे पाठ िफरवल्याची चर्चा रंगली होती.
विजेत्या गटांचा गौरव
यावेळीराजमाता जिजाऊ स्वावलंबन योजनेतील विजेत्या महिला बचतगटांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. २१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात जिल्ह्यातील ३० बचत गट सहभागी झाले आहेत. चटणी, लोणचे, बाळाची दुपटी-टोपडी, कडक भाकरी आदी वस्तू विक्रीसाठी आहेत.