आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच टन काकडी मोफत वाटून निषेध; माजी सभापती कांबळे यांनी वाटल्या काकड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काकडीचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी मंगळवारी त्यांच्या शेतातील पाच टन काकडी वरवडे (ता. मोहोळ) टोल नाक्यावर प्रवाशांना मोफत वाटून निषेध केला.

कांबळे यांनी अरण (ता. माढा) येथील शेतामध्ये आठ एकर काकडी केली. त्यांनी १८ मार्चला १६९० किलो काकडी वाशी (मुंबई) येथील बाजारात पाठवली. दहा किलोला आठ ते १५ रुपये दराने फक्त हजार ४४१ रुपये मिळाले. हमाली, तोलाई वाहन खर्च हजार ४०३ रुपये आला. कांबळेंना फक्त ३८ रुपये मिळाले. आठ एकर क्षेत्रातून त्यांना किमान दहा लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती. पाच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे मंगळवारी शेतातून निघालेली पाच टन काकडी त्यांनी बाजारात विक्रीसाठी पाठवण्याऐवजी प्रवाशांना वाटले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका बसतोय. एकाही पिकाला चांगला भाव मिळत नाही.फळ पालेभाजी उत्पादकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काकडीला भाव नसल्याने ती सर्वांना मोफत वाटून शासनाच्या शेती धोरणाचा निषेध केला आहे. शिवाजीकांबळे, जिल्हा परिषद सदस्य वरवडे टोल नाक्यावर माजी सभापती कांबळे यांनी मोफत काकडी वाटली.