आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा गाळेधारकांशी झाला करार, मध्यवर्ती भागातील गाळ्यांना होते नाममात्र भाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृह संकुलातील १७ पैकी १५ गाळेधारकांशी भाडेवाढीचा नवा करार झाला आहे. मात्र, दोन गाळेधारकांशी अद्याप करार झालेला नाही. यात एका गाळेधारकाचा भाडेवाढीस विरोध आहे तर दुसऱ्याच्या प्रशासकीय प्रक्रियेत उशीर होत आहे.
जिल्हा परिषदेला १७ गाळ्यांतून नाममात्र भाडे मिळत होते. सर्वांचे मिळून वर्षाकाठी सुमारे २२ हजार रुपये तिजोरीत जमा होत होते. नव्या कराराने भाडेवाढ झाल्याने आता वर्षाला सुमारे २० लाख रुपये िमळणार आहेत. गाळेधारक शशांक कुलकर्णी यांच्याशी अद्याप भाडेवाढीचा करार झाला नाही. त्यास त्यांची हरकत आहे. तर दुसरे गाळेधारक टपाल खाते आहे. त्यांनी भाडेवाढीचा विषय नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यांच्याकडून उत्तर आलेे नाही. त्यामुळे करार झाला नाही.

महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या, बेकायदा पोटभाडेकरू ठेवलेले गाळे ताब्यात घेऊन भाड्यासाठी फेरलिलाव काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर विषय चर्चेला आला आहे.
िजल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून त्या गाळ्यांची भाडेवाढ झालीच नसल्याचे समोर आले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साडेआठ हजार चौरस फुटाच्या जागेसाठी दर महिन्याला फक्त २२ हजार रुपये भाडे मिळत होते. त्याच चौकात महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न दर महिन्याला मिळते. १७ गाळेधारकांपैकी बहुतांश जणांनी पोटभाडेकरू ठेवले होते. तर, काहींनी दोन, तीन गाळे एकत्रित करून व्यवसाय सुरू केला आेह. त्यासाठी परवानगी घेतली नव्हती. रोज हजारोंचा व्यवसाय करणारे तेथील काहीजण नियमित भाडेही भरत नाहीत.

दोन वर्षांपूर्वी त्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली. पूर्वी शिक्षण विभागाकडे असलेली व्यापारी गाळ्याची जबाबदारी बांधकाम विभागाकडे वर्ग झाली. काही गाळेधारक स्वत:हून भाडेकरारासाठी पुढाकार घेतला. १७ पैकी ११ जणांनी भाडेकरार केला आहे. इतरांची भाडे थकबाकी अद्याप रखडली आहे. त्याबाबत ठोस धोरण घेण्याएेवजी पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणामुळेच उत्पन्न वाढीचा प्रश्न गाळात रुतला आहे.

दोन गाळेधारकांशी अद्याप करार नाही
नेहरूव सतिगृहाच्या १७ पैकी दोन गाळेधारकांशी करार झालेला नाही. त्यापैकी एक असलेल्या टपाल विभागाचा त्यांच्या मुख्य कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. तर दुसरे गाळेधारक शशांक कुलकर्णी यांचा भाडेवाढीस विरोध आहे. नवे भाडे ऑगस्ट २०१३ पासून लागू करण्यात येत आहे.” ए.बी. मुल्ला, शाखाअभियंता

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात झाली वाढ
नेहरूव सतिगृहातील गाळेधारकांची नव्याने कराराची प्रक्रिया जवळपास झाली आहे. फक्त दोघे राहिले आहेत. त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया करण्यात येईल. नवीन भाडेकरारामुळे झेडपीच्या उत्पन्नात वाढ झाली असून थकबाकी वसूल झाली आहे.” संजयमाळी, कार्यकारीअभियंता, बांधकाम विभाग एक