आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब महिलांच्या न्याय हक्कासाठी "डालसा’ची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आर्थिक परिस्थिती बेताची असणा-या आणि न्याय मागणा-या गरजू महिलांच्या पाठीशी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण (डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अॅथॉरिटी) उभी राहते. न्यायालयात अर्ज सादर करण्यापासून वकील उपलब्ध करून देणे, केस चालेपर्यंत होणारा खर्च उचलणे तसेच न्याय मिळवून देण्यापर्यंत सर्वच जबाबदारी डालसा घेते. याकरिता २६ तज्ज्ञ वकिलांची टीम आहे. दरवर्षी सुमारे ८० महिला या मोफत सेवेचा लाभ घेतात. डिसेंबर रोजी वकिल दिन असून यानिमित्त घेतलेला हा आढावा...
न्यायहक्कासाठी मदत घ्या
जिल्हाविधी सेवा प्राधिकरणच्या मोफत सेवेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आर्थिक परिस्थिती बेताची असणारी व्यक्तीही या सेवेचा लाभ घेऊ शकते. ‘डालसा’चे सदस्य त्यांच्या पाठीशी राहतील. सरोजनीतम शेट्टी, सदस्य,डालसा
डालसा’चे उपक्रम
मोफतविधी सेवेसह मोबाइल व्हॅनच्या माध्यमाने न्यायालय तुमच्या दारी, कायदा साक्षरता शिबिर, कार्यशाळा, समुपदेशन आदी उपक्रम ‘डालसा’तर्फे राबविण्यात येतात. दर महिन्याला ग्रामीण भागात विधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात.
काय आहे डालसा
जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाची (डालसा) स्थापना ८० च्या दशकात झाली. वर्षानुवर्षे न्यायालयाच्या माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, न्यायालयाचा खर्च झेपण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या लोकांच्या पाठीशी ‘डालसा’ उभी राहते. मोफत सेवेसह संपूर्ण केस चालेपर्यंत न्याय मागणाऱ्याच्या सोबत प्राधिकरण राहते.
महिलांना अधिक मदत
‘डालसा’चीसेवा सगळ्यांसाठी असली तरी याची सर्वाधिक मदत महिलांना मिळालेली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महिलांसाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही. त्याामुळे जास्तीत जास्त महिला याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, वृद्ध, पीडित युवती, ७२ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती, दुर्धर आजार, एचआयव्ही संसर्गित ‘डालसा’च्या माध्यमाने न्याय मिळवू शकतात.