आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेव रकमा परत करण्यास कालबद्ध कार्यक्रम राबवा, जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिका-यांची सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील अडचणीतल्या पतसंस्थांमध्ये ६१ कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या. त्या जूनपर्यंत परत करण्याची सूचना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिली. ३१ पतसंस्थांकडील थकित कर्जवसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासही त्यांनी सांगितले. ठेवीदारांच्या रकमा परत करण्यासाठी नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक श्री. मुंढे यांच्या अध्यक्षेखाली झाली. तीत श्री. मुंढे यांनी कर्जवसुली आणि ठेवरकमांचा आढावा घेतला.
थकित कर्जवसुली करण्यासाठी वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) ३१ मार्चपर्यंत तयार करण्याच्या सूचना श्री. मुंढे यांनी दिल्या. तसेच दोषी संचालकांवर कारवाई करण्यासाठी सहकार कायदा १९६० च्या कलम ८३ आणि ८८ अन्वये चौकशी पूर्ण करण्यासही सांगितले. सहा महिन्यांत ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. या वेळी जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय मंडलिक, पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड आदी उपस्थित होते.
पतसंस्थांच्या ठेवीसंदर्भातील जिल्हास्तरीय कृती समितीच्या बैठक सुचना देताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे. यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
९० कोटी परत केल्या
२००७अखेर १५१ कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थांत अडकल्या होत्या. थकित कर्जवसुली करून २०१४ मध्ये ९० कोटी रुपयांच्या ठेवी परत केल्या, अशी माहिती श्री. लावंड यांनी दिली. काही संस्थांची चौकशीही पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशी रखडणारच
यापूर्वीचेजिल्हािधकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर २०१४ मध्ये बैठक झाली होती. तीत पतसंस्थांची चौकशी दोन महिन्यात पूर्ण करण्याचे ठरले होते. परंतु सहकार खात्याने काहीही केले नाही. आता सहा महिन्यांची आणखी मुदत मिळाली.
सावकारी िनयंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची बैठकही याच वेळी झाली. तीत िजल्ह्यात एकूण १६४ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. याबाबत त्वरित चौकशी पूर्ण करण्याचे अादेश जिल्हािधकारी तुकाराम मुंढे यांनी दिले.