आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District O Bank Officer Gurudeo Ubale Suicide Issue

जिल्हा बँकेचे अधिकारी उबाळे यांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हामध्यवर्ती बँकेच्या बार्शी शाखेतील अधिकारी गुरुदेव विठ्ठल उबाळे यांनी तणनाशक द्रव पिऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे. याची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.
गुरुदेव उबाळे (वय ५२, रा. उपळे दुमाला, ता. बार्शी, सध्या गीता लॉज, खोली क्रमांक एक, पहिला मजला, पांजरापोळ चौक) हे उपळे दुमाला येथे अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री १० वाजता लॉजमधील लाइट गेल्याने त्यांनी मेणबत्ती आणली तेव्हापासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. लॉजमधील कर्मचाऱ्यांना दुपारी साडेतीन वाजता ते मृतावस्थेत आढळून आले. सिव्हिलमध्ये तपासणीअंती त्यांनी राऊंडअप नावाचे तणनाशक विषारी द्रव प्राशन केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.