आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीपीसीसमोर महिन्यांत 209 कोटी खर्चाचे उद्दिष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून विभागनिहाय निधी वितरित होतो. गेल्या महिन्यांमध्ये विविध विभागांना १२९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून फक्त ६६ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले आहेत. एकूण निधीशी याचे प्रमाण २४ टक्के तर वितरित निधीशी ५१ टक्के आहे. यामुळे जिल्हा िनयोजन समितीसमोर उर्वरित महिन्यांमध्ये २०९ कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील विविध विभागांना विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देतात. २०१४-१५ या चालू वर्षामध्ये २७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी शासनाकडून १६५ कोटी ४० लाख रुपयांचा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. यामध्ये १२९ कोटी रुपयांचा निधी विविध िवभागांना विकासकामांसाठी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अनेक विभागांनी प्रशासकीय मान्यताच घेतल्याने निधी वर्ग करण्यात अडचणी येत असल्याचे िनयोजन कार्यालयांकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेला ६४ कोटीचा निधी
जिल्हा परिषदेकडील विविध विकासकामांना ६४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे, यामध्ये त्यांनी ४२ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे कळविले आहे. महापालिका नगरपालिकांना १८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी दिला असून त्यापैकी कोटी खर्च करण्यात आले आहेत. कृषी अधीक्षक कार्यालयास १३ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी दिला आहे. याशिवाय जिल्हा क्रीडा कार्यालय, शासकीय रुग्णालय यांनीही निधी खर्च केला नाही. ज्या विभागांना निधीची तरतूद केली आहे, त्यांना संबंधित कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेणे अपेक्षित आहे.
१६५ कोटी प्राप्त निधीपैकी १२९ कोटी निधी संंबंधित विभागांना वर्ग केला आहे. यापैकी ६६ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ज्या विभागांकडून निधी खर्च होत नाही, त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. शशिकांतम्हेत्रे, जिल्हानियोजन अधिकारी.