आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आहे उद्योगांना संधी, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून रेटा लावला पाहिजे. नव्या आैद्योगिक वसाहती विकसित करून गुंतवणूकदारांचे स्वागत केले पाहिजे. उद्योग आले तर रोजगार वाढेल. त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासाला गती येईल.
कुशल मनुष्यबळ िनर्माण करण्यासाठी विद्यापीठही विशेष प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे. हे मुद्दे आहेत कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांचे. ‘मेक इन सोलापूर’साठी दिव्य मराठीने अभियान सुरू केले. शैक्षणिक, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर यासाठी संवाद साधणार आहेत. त्याची सुरवात कुलगुरू यांच्यापासून...
उद्योग आणण्यासंबंधी प्रयत्न झाले तर सोलापूर उद्योगांचे माहेरघरच बनेल. स्वप्नातील उद्योगांचे सोलापूर उभे करण्यासाठी प्रयत्नांची दिशा निश्चित केली पाहिजे. केवळ रस्ते, लोहमार्ग जाळे उपयुक्त नाही. उद्योजकांना पाचारण करण्यासाठी त्यांच्या आवश्यक गरजांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. उद्योजकांना पुरेशी जमीन, इतर सुविधा उपलब्ध होऊ शकते का , हेही पाहिले पाहिजे. त्यांच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती होईल पण केवळ यासाठी उद्योग सुरू होत नाहीत. तर गुंतवणुकीतून परतावा मिळणे महत्वाचे आहे. वीज आणि पाणी, विविध परवाने, कुशल मनुष्यबळ, पुरेसे भांडवल यांच्या सुयोग्य उपलब्धेनुसार नवे उद्योग सुरू होऊ शकेल. केवळ मार्केटिंग द्वारे हे शक्य होईल असे नाही. पूर्वी मिल कार्यरत होत्या. बदलत्या काळात उद्योगधंदेही बदलत असतात. हे लक्षात घेत बदल होणे अपेक्षित आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेले मनुष्यबळ हे कोणत्याही उद्योगाचा कणा बनू शकतात.