आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Celebrates Its Third Anniversary In Solapur

तिसरा वर्धापनदिन : 'दिव्य मराठी’वर शुभेच्छांचा वर्षाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दैनिक'दिव्य मराठी’च्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्नेहमिलन’ सोहळ्याला हजेरी लावून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. बुधवारी सायंकाळी हेरिटेज गार्डनवर हा सोहळा तब्बल पाच तास रंगला.

एक एप्रिल २०१२ रोजी दैनिक 'दिव्य मराठी’ने सोलापुरात पाऊल ठेवले होतेे. आज तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त 'दिव्य मराठी' परिवारातर्फे बुधवारी सायंकाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला हा सोहळा रात्री दहापर्यंत सुरू होता. आलेल्या प्रत्येक मान्यवरांकडून "दिव्य मराठी'च्या तीन वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले जात होते. विधानसभेचे अधिवेशन चालू असतानाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी अधिवेशनाचे कामकाज आटोपून मुंबईहून सोलापुरात येऊन शुभेच्छा दिल्या. राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सहकार, उद्योग, व्यापार, सामाजिक, पत्रकारिता, शासकीय अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला.

शुभेच्छांचावर्षाव... महापौरप्रा. सुशीला आबुटे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय मंडलिक, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, विक्रीकर खात्याचे सहआयुक्त पुरुषोत्तम गावंडे, वस्त्रोद्योग खात्याचे संचालक श्रीकांत मोरे, उद्योगपती यतीन शहा, वालचंद शिक्षण समूहाचे सचिव रणजित गांधी, उद्योगपतीदत्ता सुरवसे, डी. राम रेड्डी, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष किशोर चंडक, उद्योगपती बाबू चव्हाण, उपमहापौर प्रवीण डोंगरे, महापालिका स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, माजी महापौर आरीफ शेख, एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर सपाटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी आमदार नरसय्या आडम, दिलीप माने, माजी खासदार धर्मण्णा सादूल, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, "जोहड'कार सुरेखा शहा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.