आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकात 'मनसोक्त मराठी' कार्यशाळेस प्रतिसाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- संगणकात मराठी सोप्या पध्दतीने वापरण्यासाठी संगणकात वापरा, मनसोक्त मराठी या ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित दोन दिवसांच्या मोफत उपक्रमास शुक्रवारी सुरुवात झाली. जागतिक भाषांचे अभ्यासक व संगणक तज्ज्ञ शुभानन गांगल (मुंबई) यांनी मार्गदर्शन केले. पहिल्याच दिवशी सुमारे 350 जणांनी सहभाग नोंदवला.

मराठीचा वापर फेसबुक, ऑकरुट एक्सेल, पॉवर पाइंट, वर्ड, कोरल ड्रॉ, पेजमेकर आदी ठिकाणी सहज करता येतो. मराठीतील सर्व साहित्य, कविता, गझल या जागतिक पातळीवर संगणकाच्या माध्यमातून पोहोचवता येतील. तंत्रज्ञानामुळे आता मराठी टाइप करणे अत्यंत सोपे झाले आहे, असे गांगल यांनी सांगितले. शनिवारी सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात (उमा भागवत कॅम्पाउंड, मुरारजी पेठ) कार्यशाळा होणार आहे. सोपे मराठी सॉफ्टवेअर लॅपटॉप किंवा पेन ड्राइव्हमध्ये मोफत कॉपी करून दिले जाईल. नोंदणीसाठी 10 ते 1 वेळेत संपर्क (8411951000) साधावा.