आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Congratulation To Builder, Who Make Batter Solapur

दिव्‍य मराठीकडून बांधकामातील एक्‍सलंसचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "सोलापूर हे पुणे, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकच्या जणू कुशीत वसलेले शहर आहे. येथे औद्योगिक संस्कृती वाढणे गरजेचे आहे. बांधकाम व्यवसाय आर्थिक अडचणीतून जात असताना दैनिक "दिव्य मराठी'ने केलेला हा गौरवपर उपक्रम उत्तम आहे,' असे प्रतिपादन एनटीपीसीचे जनरल मॅनेजर नरेंद्र राय यांनी केले. दैनिक "दिव्य मराठी'च्या वतीने रविवारी सायंकाळी पाच वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे रिअल इस्टेट एक्सलन्स अॅवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित महापौर सुशीला आबुटे, लक्ष्मी हायड्रोलिक्सचे शरदकृष्ण ठाकरे, जनरल मॅनेजर राय, एमएसएम स्टीलचे व्यवस्थापकीय संचालन मंगेश मलंग, इथॉस रिलेटर्सचे तुषार गायकवाड यांच्यासह दैनिक "दिव्य मराठी'चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, युनिटहेड टिंकेश ग्यामलानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.

रिअल इस्टेट व्यवसायात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. तरीही हा व्यवसाय तग धरून आहे, याबद्दल आनंद वाटतो. थर्मल प्लांट शहरात आल्याने तापमान वाढेल का, असा प्रश्न सारखा विचारला जातो. दैनिक "दिव्य मराठी'ने नागरिकांतील हा गैरसमज दूर करावा, असे आवाहन राय यांनी केले.

स्वागतपर भाषणात श्री. पिंपरकर यांनी भारतात क्रमांक एकवर असणाऱ्या दैनिक "भास्कर'चे यश, राखलेला दर्जा आणि नीतिमूल्ये यामुळे याला वेगळे स्थान असल्याचे सांगितले.
सोलापूरचा विकास होतोय : ठाकरे
श्री.ठाकरे म्हणाले, "दैनिक "दिव्य मराठी'ने असा गौरव केला हे चांगले आहे. जगात सर्वत्र चीनचे साहित्य चालते. पण आमच्या कंपनीत तयार केलेले साहित्य एनटीपीसीसह युरोप आणि खुद्द चीनमध्येही मागितले जाते, याचा मला अभिमान आहे. सोलापूरचा विकास होतोय, प्रिसिजनसारख्या कंपन्या येथे आहेत. त्यांचे कॅमशाफ्टही परदेशात विक्री होतात. "दिव्य मराठी'ने शहराचे सौंदर्य वाढवण्याचे जे काम केले आहे, त्याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम दरवर्षी होणे गरजेचे आहे. सोलापूरची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे.'

महापौर आबुटे म्हणाल्या, "केलेल्या कामाचा सन्मान होणे गरजेचे असते. ते काम "दिव्य मराठी'ने केले आहे.'