आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi With People Oppose To Theft Or Robbery

दिव्य मराठी अभियान: नागरिक, पोलिस सरसावले, चोऱ्यांविरुद्ध उपाय करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चोऱ्या,घरफोड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासन नागरी संस्थाही सकारात्मक आहेत. चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याने देशभर आणि जगभर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सोलापुरातही ‘दिव्य मराठी’ने लोकजागृती अभियान सुरू केले

पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह नागरी संस्थांनी अभियानाचे स्वागत केले. लोकसहभाग, बांधकाम व्यावसायिक, सुरक्षा एजन्सीज, गृहनिर्माण संस्था यांची मदत घेऊन घरफोड्यांवर नियंत्रण मिळवू, असे पोलिसांनी सांगितले. दमाणी नगर परिसतील ‘प्रतीक्षा बंगलो’च्या रहिवाशांनी कॉलनीत सुरक्षा यंत्रणा सुरू करणार असल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, तरुणांच्या मदतीने आम्ही सुरक्षेची अधिक खबरदारी घेणार असल्याचे रहिवासी रवींद्र कोप्पा, प्रकाश जाधव यांनी सांगितले.

सामुदायिक उपाय योजू
-प्रतीक्षाबंगलोज ही ७५ घरांची सोसायटी आहे. व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार येथे आहेत. रहिवाशांनी सोमवारी एकत्रित येऊन चर्चा केली. चार दिवसांत सुरक्षेसंदर्भात सामुदायिक उपाययोजना करू” रवींद्रनाशीकर, रहिवासीव्यावसायिकांचीबैठक घेऊ

-बांधकामव्यावसायिक घरफोडी टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेची कोणती उपायोजना करतात, याची माहिती घेण्यासाठी क्रेडाई सोबत बैठक घेऊ. पोलिस आयुक्तांसोबतच्या बैठकीत सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअर बेल, सुरक्षा रक्षक याची चर्चा करू. सातही ठाण्याच्या हद्दीत सोसायटी, कॉलनीतील लोकांना एकत्रित बोलावून सूचना देऊ.” सुभाषबुरसे, पोलिसउपायुक्त