आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dixit Honour Rangappa Vaidya And Jakkal For Kambale

दीक्षित यांना रंगाण्णा वैद्य तर कांबळेंना जक्कल पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाण्णा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना जाहीर झाला. ‘दिव्य मराठी’चे वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे यांना पत्रमहर्षी बाबूराव जक्कल स्मृती जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. १३ मे रोजी स्व. रंगाण्णा वैद्य यांच्या जन्मदिवसाचे आैचित्य साधून त्याचे वितरण होईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली.
वैद्य स्मृती पुरस्कार २५ हजार तर जक्कल पुरस्कार १५ हजार रुपयांचा आहे. शिवाय स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देण्यात येते. ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा दिग्गजांना वैद्य स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जक्कल पुरस्कार हा स्थानिक पत्रकारांना देण्यात येतो. ख्यातनाम विधिज्ञ धनंजय माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, शंकर पाटील, अॅड. भगवान वैद्य हे िनवड समितीचे सदस्य आहेत.