आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर जाधव आत्महत्येची ३ डॉक्टर करणार चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय रुग्णालयातील डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थािनक तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी मंगळवारी दिली. डॉ. ऋत्वीक जयकर, डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल, डॉ. पंडित यांची ही समिती आहे.

दोन दिवसांत विविध विभागांतील डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. डॉ. जाधव यांनी आत्महत्या का केली, याबाबत त्या विभागातील सहकारी डॉक्टर, कर्मचारी यांचेही मत जाणून घेण्यात येईल. दोन दिवसांत हा अहवाल डीनकडे सादर होईल.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन विभागाची समिती सोमवारी सोलापुरात येऊन माहिती जाणून घेतली. त्याचा अहवाल संचालक व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना देणार आहे. सोलापूरच्या समितीकडूनही आलेला अहवाल त्यांना देण्यात येणार आहे.
आम आदमी पार्टीतर्फे धरणे आंदोलन
आम आदमी पार्टीतर्फे मंगळवारी डीनच्या चेंबरसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. डॉक्टरांचा होणारा छळ, सिव्हीलमधील कमी संख्याबळ, साप्तािहक सुटी मिळत नाही. कनिष्ठ सहकऱ्यांवरील कामाचा ताण येतो याबाबत उपाययोजना करावी अशा आशयाचे निवेदन डीन श्रीमती अग्रवाल व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती यशवंत फडतरे व आम आदमी पार्टीचे युवा संघटक सागर पाटील यांनी दिली. यावेळी विलास शहा, चंदुभाई देिढया, रुद्रप्पा बिराजदार, गौतम सोनटक्के, मकरंद चनमल, व्ही. डी. गायकवाड, हेमंत येवले आदी उपस्थित होते. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत हे आंदोलन झाले.
जाधव परिवाराला मदत द्या
डॉ. जाधव यांच्या परिवाराला पन्नास लाखांची मदत द्या. एकाला शासकीय सेवेत सामावून घ्या, या आशयाचे निवेदन मार्डतर्फे वैद्यकीय शिक्षण संचालनालय, डीन, वैद्यकीय आरोग्य शिक्षणमंत्री यांना फॅक्सव्दारे देण्यात आल्याची माहिती मार्ड संघटना सोलापूरचे अध्यक्ष राहुल राऊत यांनी दिली.