आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Doctor Strike Still Going On Till Demands Not Fulfill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच; डॉक्टरांचा पवित्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - 1 जुलैपासून काम बंद ठेवून आंदोलनात उतरलेल्या डॉक्टरांचा चौथ्या दिवशीही पवित्रा कायम होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांना नोटीस बजावली. मात्र, या नोटीसचे दहन करून डॉक्टरांनी निषेध नोंदविला.

विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केल्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. प्रशासनाने 62 आयुर्वेदिक डॉक्टरांची मदत घेतल्यामुळे काही प्रमाणात गैरसोय कमी झाली आहे. मात्र, दुसरीकडे संप मिटण्याची शक्यता नसल्यामुळे प्रशासनाने संपावर गेलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन अधिनियम 2011 मधील कलम (7)(8)(9)व (11) अन्वये कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील 31 डॉक्टर संपावर गेले असून, त्यांना गुरुवारपासून नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी संपावर गेलेल्या सर्वच डॉक्टरांना नोटीस बजावल्या. दरम्यान, शुक्रवारी दुपारी या डॉक्टरांनी आंदोलनस्थळी नोटीसचे दहन केले. यावेळी डॉ. सचिन देशमुख, डॉ. अभिजित बागल आदी उपस्थित होते.

माहिती कळविली
जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी, करारानुसार, बॉन्डेड डॉक्टरांची माहिती तातडीने कळविण्याचे आदेश सरकारकडून आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने ही माहिती सरकारला सादर केली आहे.

निर्णयाकडे लक्ष
राज्यातील डॉक्टरांच्या भूमिकेमुळे रुग्णसेवेवर परिणाम जाणवू लागले आहेत. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळे शासन स्तरावरून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

आंदोलन कायम, कारवाई करा
शासनाने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, यावेळी शासनाच्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. नोटीसला आम्ही जुमानणार नाही. राजीनामे यापूर्वीच दिलेले आहेत. शासनाने आवश्य कारवाई करावी, असे संघटनेच्या डॉक्टरांनी सांगितले.

शल्यचिकित्सकांच्या गळ्यात स्टेथेस्कोप
एरव्ही प्रशासकीय कामामध्ये व्यस्त असणा-या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या गळ्यात 4 दिवसांपासून कामयस्वरूपी स्टेथेस्कोप दिसत आहे. शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण हे बालरोग तज्ज्ञ असून, त्यांना वॉर्डामध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करावी लागत आहे.

शासन कारवाई करणार
शासनाच्या निर्देशानुसार संपावर गेलेल्या डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, एकाही डॉक्टरने नोटिसीसंबंधी खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. शासन याबाबत निर्णय घेणाार आहे.’’ डॉ. जे. एम. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.