आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. राज्यासह सोलापुरातील डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतल्याने आज रुग्णांचे हाल झाले.आज सकाळी शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली.

मार्ड संघटनेच्या राज्यव्यापी संपात सोलापुरातील १४० निवासी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात दिवसभर रुग्णांचे हाल झाले. अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागले. शासकीय रुग्णालयात पर्यायी वैद्यकीयसेवा उपलब्ध केली तरी रुग्णांचे हाल झाले.

प्रलंबित मागण्यांकडे सरकार लक्ष वेधण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. सोलापुरातील निवासी डॉक्टर या आंदोलना सहभागी झाले आहेत. जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील. पुनीत छाजेड, अध्यक्ष, मार्ड सोलापूर

पदव्युत्तर निवासिता पूर्ण झाल्यानंतर महिन्याच्या कालावधीत रुजू करून घेण्यात यावे, क्लिनिकल पॅराक्लिनिकल शाखेतील डॉक्टरांना ट्यूटर अथवा सिनिअर रेसिडेटन्सच्या जागा उपलब्ध करून द्यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसंबंधी निर्णयात पारदर्शकता असावी, टीबीचा संसर्ग झालेल्या निवासी डॉक्टरांना रजा मिळावी, महिला डॉक्टरांना प्रसूतिपूर्व पश्चात दोन महिन्यांची रजा मिळावी आदी.

मार्डने संप पुकारल्यामुळे पर्यायी व्यवस्था केली होती. जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. ही व्यवस्था काही दिवस असेल. गरज पडली तर बाहेरून डॉक्टर मागवण्यात येतील. विनायक डोईजड, वैद्यकीय उपअधीक्षक
छायाचित्र: निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड संघटनेच्या वतीने राज्यभरात संप करण्यात येत आहे. गुरुवारी सोलापुरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनात सहभागी होऊन शासकीय रुग्णालयसमोर निदर्शने केली.