आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांची दशा सांगणारा ‘दशी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विडी कामगारांची दशा दिशा सांगणारा माहितीपट येथील समीर सागर या तरुणाने काढला आहे. माहितीपटाचे नाव आहे ‘दशी.’ दशी म्हणजे विणलेले धागे. शहरातल्या कापड गिरण्या बंद पडल्यानंतर विडी उद्योगावरच कामगारांची उपजीविका सुरू झाली. गिरण्यांचा सुवर्णकाळ असताना धागे धागे विणले गेले. पण विडी उद्योगाची स्थिती विणलेल्या धाग्यातून नेमकी मांडण्यात आली.

सुमारे ७० हजार महिला कामगार रात्रं-दिवस विड्या वळण्याच्या कामात असतात. परंतु त्यांना अपेक्षित मोबदला मिळत नाही. त्यांच्या आरोग्याच्या उपाययोजना होत नाहीत. पिळवणुकीने त्यांची मानसिकता खच्ची करण्याचे काम झाले. पर्याय नसल्याने कामगार सारे काही सहन करतात. त्यांना पर्यायी रोजगाराची चर्चा कधी होत नाही. लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाहीत. दुसरीकडे तंबाखूजन्य उत्पादने कमी करण्याच्या उपायांत केंद्र आणि राज्य शासनाने या उद्योगावर टांगती तलवार उभी केली. त्याचा बाऊ करत कारखानदार कामात कपात करतात. किमान वेतनही नाकारतात, असा हा माहितीपट.

एक दस्तऐवज
विडी कामगारांच्या समस्या, स्थिती सांगून ४० मिनिटांचा हा एक दस्तऐवजच आहे. तंबाखूजन्य उत्पादने कमी करण्याच्या नादात या रोजगार हिरावून घेतल्यास काय स्थिती उद्भवू शकेल, याचा इशाराही यात आहे.” समीर सागर, माहितीपट निर्माता