आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या कुत्र्यांसाठी थाटलं गेलंय पाळणाघर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - धावपळीच्या जीवनात अनेक माता-पित्यांना आपल्या चिमुल्यांकडे लक्ष देता येत नाही, वेळ देता येत नाही म्हणून त्यांना पाळणाघराचा आर्शय देतात. आता आपल्या लाडक्या कुत्र्यांनाही होस्टलिंगच्या गोंडस नावाखाली पाळणाघरात ठेवण्याची संस्कृती सोलापुरात रुजत आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात दोन एकर जागेत कुत्र्यांसाठी पाळणाघर थाटण्यात आले आहे. नियो नाईट्स कॅनल नावाने चालणार्‍या या व्यवसायाचे निशीकांत कोटा आणि शिवराज पाटील हे प्रमुख आहेत. लहानपणापासून कुत्र्यांविषयी असलेल्या प्रेमातून कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी हे कॅनल सुरू करण्यात आल्याचे कोटा सांगतात.
दीड वर्षांपूर्वी शहरात कुत्र्यांसाठी पाळणाघर सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्या कल्पनेला त्यांनी मूर्त रूप दिले. आतापर्यंत शंभर ते दीडशे विविध जातींचे कुत्रे येथे ठेवण्यात आली आहेत. पाळणाघरात कुत्रे ठेवण्यापूर्वी विविध गोंष्टीची पूर्तता कुत्र्यांच्या मालकांना करावी लागते. कुत्रे ठेवण्याचे दर हे त्याच्या जातीवरून ठरतात. एका दिवसाच्या होस्टलिंगचे दर हे तीनशे ते एक हजार रुपयापर्यंत असते.
प्रसूतीही केली जाते - येथे केवळ कुत्र्यांचा सांभाळच करण्यात येतो असे नाही तर त्यांचे वॉशिंग, ब्रशिंग, कटिंगही केले जाते. मादी कुत्री पिलांना जन्म देणार असल्यास तिची प्रसूतीही डॉक्टरांच्या निगराणीखाली करण्यात येते. कुत्र्यांना येथे ठेवल्यांनतर संबधित मालकांच्या सूचनेनुसार त्यांना योग्य तो आहार दिला जातो.
अशी घेतली जाते काळजी - होस्टलिंगसाठी कुत्रा आल्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याला आजार आहे का हेही तपासले जाते. आजार होऊच नये याची खबरदारी म्हणून आधीच इंजेक्शन दिले जाते.
जसा ऋतू तसा आहार - उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून दही, ताक, आइस्क्रीम, थंड पाणी, पनीरशिवाय परिसर थंड राहावा म्हणून पंखे, कुलरही लावले जातात. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे रात्रीच्या वेळी शंभर व्होल्टेजचे बल्ब केजमध्ये लावले जातात. उकडलेली अंडी, मटन, चिकन, भात, सोयाबीन, उकडलेल्या भाज्यांमध्ये बटाटा, वांगे, फ्लॉवर हे पदार्थ त्यांना खायला दिले जातात. पावसाळ्यात मात्र जाणीवपूर्वक दुधाचे पदार्थ टाळले जातात.
डॉग केअर - मागील वर्षापासून नियो नाइट्स कॅनलचे काम सुरू, एका दिवसाला तीनशे ते एक हजार रुपये दर