आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याच्या तोंडी मानवी पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात रविवारी माणसाचा कापलेला पाय तोंडात धरून कुत्रा फिरत होता. त्याचे लचके तोडत होता. शस्त्रक्रियेनंतर काढलेले अवयव मोकळ्यावर टाकून देण्याच्या बेजबाबदार कृतीमुळे हा धक्कादायक प्रकार घडला.

हॉस्पिटल प्रशासन, अधिकारी, डॉक्टर, परिचारिका किंवा वॉचमन यांच्याही लक्षात आले नाही की उघड्यावरच पाय पडलेला आहे. पायाचा मांडीपासूनचा भाग होता. शवविच्छेदन विभागाच्या समोरील मैदानात कुत्रा त्याचे लचके तोडत होता. मधुमेह झाल्यानंतर किंवा काही दुर्धर आजाराप्रसंगी पाय कापावा लागतो. मात्र, कापलेल्या त्या पायाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या विभागाच्या संबंधितांची आहे.

अधिष्ठाता बेखबर
रुग्णालयातील प्रकाराबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना विचारले असता त्यांनी वैद्यकीय अधीक्षक एम. ए. जमादार यांच्याशी संपर्क करा, असे उत्तर दिले. जमादार हे परीक्षेसाठी हैदराबादला गेल्याची कल्पनासुद्धा र्शी. शिंदे यांना नव्हती. ही बाब लक्षात आणून दिली. नंतर र्शी. शिंदे यांनी डॉ. तावरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

.. तर जबाबदार नाही
मानवी पायाचा भाग सिव्हिल हॉस्पिटलमधील असेल तर याबाबत संबंधित सर्व विभागाकडे चौकशी केली जाईल. दोषी आढळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, कुत्र्याने तो पाय रुग्णालयाच्या बाहेरून आणला असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही.’’ जी. बी. तावरे, वैद्यकीय उपअधीक्षक