आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांचा उच्छाद सुरूच; महापालिका प्रशासन मात्र अजूनही ढिम्मच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निहारिका कोंकाटी या अडीच वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवून ४८ तास उलटले. तरीही महापालिकेच्या यंत्रणेने कुठल्याच हालचाली केलेल्या नाहीत. नीलमनगरात झालेल्या या घटनेनंतर तेथील परसिरात कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली. लहान मुलांबद्दल पालकांची िचंता वाढली. यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनाही भीती वाटते. पालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नीलमनगरातील या घटनेची बातमी ‘दिव्य मराठी’त प्रसिध्द झाल्यानंतर अस्वस्थ नागरिक बोलू लागले. ज्यांना कुत्र्यांनी चावा घेतला, त्यांनी अनुभव कथन केले. अँटी रेबीजचे इंजेक्शन हाच पर्याय का? मुक्या जीवांना जगू द्या, पण मानवी जीवांचे काय? त्यांच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लष्कर भागात मधुमालती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे अॅड. चं. म. उपाध्ये म्हणाले. झोपडपट्ट्यांमध्येही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सामािजक कार्यकर्ते अशोक बल्ला यांनी केली.
निहारिका ठीक
विहारिकाला पाहण्यासाठी मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उगीच गर्दी होत आहे. त्यामुळे ती घाबरली. तिला वशिेष कक्षामध्ये दाखल करून उपचार करतो आहोत. आता तिची प्रकृती उत्तम आहे. परंतु इन्फेक्शन होऊ नये, याची काळजी घेत आहोत, अशी मािहती मार्कंडेय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. वविोद जनई यांनी दिली.
तर अधिकाऱ्यांवर गुन्हा
कुत्र्यांना मारण्याचे विकष व कायदा समजून न घेता कुत्र्यांना मारताच येत नाही, असे म्हणून अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. श्वानदंशाने कुणी दगावलाच तर संबंिधत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करता येतो.”
अॅड. प्रकाश जन्नू, कायदेतज्ज्ञ
नागरी हितसंरक्षणाची मूलभूत जबाबदारी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्याची आहे. ते जर चालढकल करत असतील तर त्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते.”
अॅड. संतोष न्हावकर, कायदेतज्ज्ञ