आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळकर जयंतीत डॉल्बी टाळण्याचा मंडळाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव महामंडळाने मिरवणूक डॉल्बी टाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी दिली. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे उपस्थित होते.

डॉल्बी विरोधी भूमिकेस मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती मंडळ महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती मडळांनी त्या बंदीचे स्वागत केले. तसेच, सोलापुरातून डॉल्बी हद्दपार करण्याची मागणी केली.

श्री. पिसे म्हणाले, "नूतन पोलिस आयुक्तांनी डॉल्बी बंदीचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून त्याचे आम्ही स्वागत करतो. यंदाच्या वर्षी अहिल्यादेवी जयंती उत्सवास जे नियम लावण्यात आलेत, तेच नियम पुढच्या काळात इतर उत्सवांना लागू करावेत, अशी आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. भविष्यात त्या नियमांची कठोर अंमलबजावणी झाल्यास प्रशासनाने फक्त आमच्यावर अन्याय केला, अशी आम्हा कार्यकर्त्यांची भावना होईल. पोलिस आयुक्त त्याबाबतची काळजी घेतील, असा विश्वास आम्हाला आहे."

यंदाच्या वर्षी जयंती मिरवणूक काढण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल वाजवून जागेवर विसर्जन करण्यात येईल. तसेच, मिरवणुकीवर खर्च होणारा पैसा सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरण्यात येईल, असेही पिसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मडळाचे अध्यक्ष दशरथ शेंडगे, सुनील खटके, संकेत पिसे आदी उपस्थित होते.

डॉल्बी बंदच्या निर्णयाचे स्वागत
कायद्याचीनिर्मितीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्याचा प्रभावी अंमल आवश्यक आहे. तशी अंमलबजावणी हिम्मतराव देशभ्रतार पोलिस आयुक्त असताना झाली होती. आंबेडकरी चळवळ या निर्णयाचे स्वागत करते.
जासरवदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती मंडळ
पोलिस आयुक्तांचा योग्य निर्णय
डॉल्बीबंदीचा निर्णय योग्य आहे. पण, त्याचा प्रभावी अंमल हवा. आयुक्तांच्या या भूमिकेचे स्वागत करतो.
प्रकाश हत्ती, महात्माबसवेश्वर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ
काही वर्षांपासून अनुकरण
गणेशोत्सवमिरवणुकीत डॉल्बीला पूर्णत: बंदी घालण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेलाच आहे. यापूर्वी आम्ही त्याबाबतच्या सूचना मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या असून त्याबाबतचे अनुकरण आम्ही करतोय. दोन ते तीन वर्षांपूर्वी डॉल्बीच्या आवाजामुळे आमच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक कार्यकर्त्यांना मिरवणुकीनंतर त्या दणदणाटामुळे त्रास झाला आहे. त्यामुळे आम्ही डॉल्बी वापरण्याच्या विरोधातील असून गेल्या काही वर्षांपासून त्याचे अनुकरण आम्ही करतोय.
सुनील रसाळे, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...