आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीपीसीचे फुंकले रणशिंग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची लागली रंगतदार निवडणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण 7, महापालिकेतील एक आणि नगरपालिकेतील तीन जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. नगरसेवक अरिफ शेख यांच्या जागेसाठी निवडणूक लागणार की ते बिनविरोध होणार हे 12 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात ठरणार आहे. नगरसेवक देवेंद्र भंडारे यांचा अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केल्याने त्यांची आणि नरसुबाई गदवालकर यांच्यात निवडणूक लागली आहे.

जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून जिल्हा परिषद 27, महापालिका 9 आणि नगरपालिकेतून 4 जणांना निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी सुरू असलेल्या निवडणुक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याचा दिवशी मंगळवारी निवडणूक लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 27 पैकी 20 जागा बिनविरोध झाल्याने सर्वसाधारण पुरुष गटातील सात जागांसाठी निवडणूक लागली आहे.

महापालिकेतील नऊ जागा पैकी महेश कोठे, सूर्यकांत पाटील, संजीवनी कुलकर्णी, शोभा बनशेट्टी, सुनीता रोटे,रार्जशी कणके, अश्विनी जाधव सात जागा बिनविरोध झाल्या तर अरिफ शेख यांच्या जागेसाठी निवडणुकीबाबत 12 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात निकाल आहे. नगरपालिकेच्या चार जागांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर पंढरपूरच्या अनिता सर्वगोड या बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण स्त्रियांसाठीच्या एक व नागरिकांचा मागास प्रवर्ग एक व सर्वसाधारण पुरुष अशा तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. 14 फेब्रुवारीला मतदान आणि 16 फेब्रुवारीला मतमोजणी आहे.

जिल्हा परिषद क्षेत्र उमेदवार
सांगोल्याचे अशोक बबन शिंदे, करमाळ्याचे सुभाष जगन्नाथ गुळवे, माळशिरसचे शहाजीराव देशमुख, मंगळवेढय़ाचे शिवाजी नागणे, बार्शीचे संजय पाटील, पंढरपूरचे श्रीकांत बागल, माढय़ाचे झुंजार भांगे, दक्षिण सोलापूरचे सुरेश हसापुरे या सर्व साधारण प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निवडणूक लागली.

मनपा क्षेत्रातील उमेदवार
काँग्रेसचे देवेंद्र भंडारे आणि भाजपच्या नरसुबाई गदवालकर यांच्यात निवडणूक रंगणार आहे. परंतु 12 फे ब्रुवारीला उच्च न्यायालयातील निकालावर मतदान होणार की नाही हे ठरणार आहे.

नगरपालिका क्षेत्र उमेदवार
सर्वसाधारण प्रवर्गातील मंगळवेढय़ाचे अजित जगताप, करमाळ्याचे सुभाष लक्ष्मण जगताप, बार्शीचे गणेश वैजिनाथ जाधव, मागास प्रवर्गातील माढय़ाचे सूर्यकांत गोरे, मंगळवेढय़ाचे सुहास पंडित, बार्शीचे अरुण बारबोले, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून करमाळ्याच्या पुष्पा फंड, कुडरुवाडीच्या स्वाती अरविंद पवार यांच्यात निवडणूक लागली आहे.