आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Bharat Patankar,Latest News In Divya Marathi

‘सांस्कृतिक विद्रोहाची धार अधिक तेज करू’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नव्या आर्थिक बदलासोबतच सांस्कृतिक, बौध्दिक, राजकीय प्रवाहात नवे वारे वाहताना दिसते आहे. या बदलामुळे समाजमनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे नव्या सांस्कृतिक संघर्षासाठी विद्रोहींनी आपली लढय़ाची धार अधिक तेजस्वी करावी, असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पाटणकर यांचा येथे सोमवारी सत्कार झाला.
येथील गोविंदर्शी मंगल कार्यालयात पार्थ पोळके यांच्या प्रमुख उपस्थिती व जिल्हाध्यक्ष मदन पोळके, बाबासाहेब रासकर, चंद्रकांत संगईत, महेश कांबळे यांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा रंगला. डॉ. पाटणकर म्हणाले, 1999 मध्ये मुंबईच्या धारावीमध्ये पहिले संमेलन झाले. राज्यात युतीचे शासन होते. बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यकांना बैल म्हणून संभावना केली होती. त्या पार्श्वभूमीवर धारावीतील पहिले विद्रोही साहित्य संमेलन हा दलित बहुजन समाजाचा एक हुंकार होता. पोळके यांनी ब्राrाणी, वैदिक परंपरेवर कोरडे ओढले.
संमेलनाध्यक्षांविषयी
कोल्हापूर येथे 2 व 3 ऑगस्ट रोजी 12 वे विद्रोही सांस्कृतिक संमेलन होत आहे. संमेलनाध्य डॉ. भारत पाटणकर आहेत. डॉ. पाटणकर हे र्शमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष आहेत. सिंधू की हिंदू, जातीय भांडवली लैंगिक शोषण, शोषणमुक्त अर्थव्यवस्था ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विठ्ठल हा बहुजनांचा देव असून विशिष्ट जातीधर्माचा नाही, बडवे - उत्पात हटाव आंदोलनात ते अग्रभागी होते.