आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Kiran Jadhav Suicide News In Marathi, Solapur, Divya Marathi

डॉ. जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील डॉक्टरांच्या पथकाने केली चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील डॉक्टरांच्या पथकाने सोलापुरात येऊन सोमवारी विभागप्रमुखांची चौकशी केली. डॉ. व्यास, डॉ. राव, डॉ. हिराळे यांनी डॉक्टर, शिक्षक आदींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवून घेतले.

हा अहवाल 24 तासांत वैद्यकीय संचालकांना सादर होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. ज्या रूममध्ये डॉ. जाधव यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली त्या खोलीची पाहणी पथकाने केली.

तृतीय श्रेणी कर्मचारी, एसआर (सर्व्हिस रेसिडेन्सी), विभागात कर्मचा-यांचे संख्याबळ कमी आहे. त्या जागा त्वरित भराव्यात. त्यामुळे अन्य साथीदारांवर कामाचा ताण येतो, या आशयाचे निवेदन मार्डतर्फे डॉक्टर पथकाला दिल्याचे मार्डचे अध्यक्ष राहुल राऊत यांनी सांगितले.