आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर जयंतीनिमित्त यंदा प्रथमच शहर स्वच्छता मेळा, सामाजिक संघटनांची उत्सवाची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती मिरवणूक मार्गाची स्वच्छता मोहीम सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला सुरू होईल. डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात होणार अाहे. नागरिकांनीही यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त विजयकुमार काळम- पाटील यांनी केले.
शनिवारी पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटी बैठक झाली. त्यावेळी पंढरपूरप्रमाणे सोलापुरातही स्वच्छता मोहीम घेण्यात यावी, असा मुद्दा कार्यकर्त्यांमधून समोर आला. त्यानंतर श्री. काळम-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पहिला टप्पा म्हणून आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम होईल. यात मनपा कर्मचारी, अधिकारी सहभागी होतील. नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या टप्प्यात शहरातील एकेक भाग घेणार असल्याचे ते म्हणाले.
बैठकीत यांची उपस्थिती होती
शांतताकमिटीच्या बैठकीस राजाभाऊ सरवदे, जोत्स्ना काळे, सुबोध वाघमोडे, राजाभाऊ इंगळे यांच्यासह अरुण भालेराव, विष्णू कारमपुरी, आनंद चंदनशिवे, युवराज पवार, अशोक जानराव, प्रकाश गेंट्याल, केशव इंगळे, कार्यकर्ते, पदाधिकारी, कमिटीचे सदस्य उपस्थित होते.