आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगता मिरवणूक : डीजेचा दणदणाट; जयंती उत्सवाची सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डीजेचा दणदणाट, ड्रोन कॅमेरा, प्रखर दिवे, कंटेनर, मोठमोठे देखावे यंदाच्या डॉ. बाबासाहेब जयंती उत्सवाच्या सांगता मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या दणदणाटात तरुणाई देहभान विसरून जल्लोष करताना दिसली.
रविवारी (दि. १९) सकाळी दहा वाजल्यापासून पार्क चौकात लहान मोठ्या मंडळांची गर्दी होत होती. सर्व मंडळे डॉ. आंबेडकर चौकात (पार्क) जमल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपारी मध्यवर्ती मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत भीम्रप्रेमींनी गुलालाची मुक्तपणे उधळण केली. अबाल, वृद्धांच्या हातातील निळे झेंडे, निळे गमजे, जय भीमच्या घोषणा यामुळे एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. रात्री बाराच्या सुमारास मिरवणुका विसर्जित झाल्या.

कोल्हापूरहून मागवली लाइट सिस्टीम

जयंती मिरवणुकीत पूर्वी एखाद-दुसऱ्या मंडळाकडे प्रखर झोताच्या दिव्यांची यंत्रणा असायची. परंतु यंदाच्या मिरवणुकीत सर्वच मंडळांनी याचा उपयोग केला. कोल्हापूरहून अनेक लाइट सिस्टीम मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये रंगीबेरंगी लाइट्सने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.
डॉ. बाबासाहेबांची छायाचित्रे आणि त्यांचे विचार देखाव्यांतून मांडण्यात आले. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पूर्ण परिसराचे चित्रीकरण करून स्क्रिनवर दाखवण्यात येत होते. कॅमेऱ्याची ही सिस्टीम छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान होती.
बातम्या आणखी आहेत...