आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांना हवी होती लोकविधायक दादागिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना फालतू लोकशाही मान्य नव्हती. त्यांना लोकविधायक दादागिरी हवी होती. म्हणूनच अन्यायग्रस्त मराठी माणूस हा पोलिसांकडे जाण्यापूर्वी शिवसैनिकांकडे जात होता. जिथे अन्याय ितथे शिवसेना, हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहात आला आहे. तेच शिवसेनेचे बलस्थान आहे हे विसरून चालणार नाही. असे प्रतिपादन, डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उपशहर प्रमुख सुनील कामाठी आणि खड्डा तालीम यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे डॉ. शेटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र, विचार आणि आजची गरज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
अध्यक्षस्थानी िजल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, उद््घाटक जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील भाजपचे शहाराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी होते. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, ज्येष्ठ शिवसैनिक बाबूराव वडणे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, युवा सेनेचे गणेश वानकर, भीमाशंकर म्हेत्रे उपस्थित होते.
व्याख्यानातून उलगडले हे पैलू
- मार्मिक साप्ताहिकातल्या व्यंगचित्रांनी मराठी माणसांत स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले.
- सामान्य शिवसैनिक बाळासाहेबांच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता.
- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही त्यांची अाग्रही भूमिका होती.
- प्रलोभनाला बळी पडणारी शिवसैनिकांची अभेद्य फळी तयार केली.
- वक्तव्य केल्यानंतर मी असे म्हटलेच नव्हते, असे विधान त्यांनी कधीच केले नाही.
- ९२ मध्ये बाबरी मशिद पाडण्याचे काम माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली.
समीकरणे बदलली अन्...
डॉ. शेटे यांनी शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे जीवनपैलू उलगडून दाखवले. "बाळासाहेब ठाकरे यांचे जगाला आकर्षण होते. ते जणू एक दंतकथाच होते. ते िजवंत असताना त्यांची ताकद होतीच. त्यांच्या मृत्यूनंतरही ती कायम आहे. शिवसेना स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रातील स्थिती बिकट होती. मराठी माणूस स्वत:च्या राज्यातच उपरा झाला होता. स्वाभिमानशून्य झालेल्या मराठी माणसांत प्राण फुंकण्याचे काम बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून केले. त्यांना निवडणुकांच्या राजकारणात पडायचे नव्हते. सेनेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचे होते. मात्र समीकरणे बदलली अन् शिवसेनेने निवडणुका लढवण्यास सुरुवात केली.'
वातावरण झाले भगवेमय
बुधवारी दुपारपासूनच स्मृती मंदिर परिसरात शिवसैनिकांची रेलचेल सुरू झाली. दुभाजकांवर आणि चौकात भगव्या ध्वजांनी वातावरणनिर्मिती करण्यात आली. डॉ. आंबेडकर चौकात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे हुतात्मा स्मृती मंदिर भरून गेले होते.
बाहेरील प्रांगणात स्क्रीनची सोय केली होती. स्क्रीनसमोरही शिवसैनिकांची गर्दी झाली होती. जय भवानी जय शिवाजी, एकच साहेब बाळासाहेब अशा गर्जना सभागृहात करण्यात येत होत्या. यावेळी सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. डाॅ. शेटे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. जुने शिवसैनिकही आवर्जुन आले होते.
बातम्या आणखी आहेत...