आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूराष्ट्र करणे म्हणजे संविधानाचा अपमान : डाॅ. आढाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि लोकशाही या मूल्यांवर देश चालतो, ही बाब सरसंघचालक मोहन भागवत यांना माहीत नाही काय? हिंदूराष्ट्र करण्याची त्यांची इच्छा म्हणजे संविधानाचा अपमान आहे’, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी रवविारी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही होतो. तुम्ही (संघ) नव्हता. पण तुमची वक्तव्ये ऐकून कशाला स्वातंत्र्यलढ्यात पडलो, असा विचार मनात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
थाेर स्वातंत्र्यसैनिक भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘समता प्रत्यक्षात येईल कशी?’ हा विषय होता. डॉ. आढाव म्हणाले, ‘नेपाळने घटना दुरुस्ती करून ‘हिंदू राष्ट्र’ हे ब्रीदच काढून टाकले. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ख्रशि्चन राष्ट्रे आहेत काय? त्यांनी लाेकशाहीवाद स्वीकारला. पण देशाच्या नव्या राज्यकर्त्यांनी आपल्यापुढे आव्हान उभे केले आहे.’
देशापुढे भारताचा अजेंडा असेल की संघाचा? ’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘आज कॉर्पोरेट भांडवलशाहीचे आव्हान निर्माण केले. ज्यामुळे श्रमकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला. खेड्यातील ८ कोटी ज्येष्ठ मंडळींना पेन्शन नाही. ४५ कोटी असंघटित कामगारांना भवितव्य नाही. त्यांचे प्रश्न लोकसभेत येतच नाहीत. त्यामुळे सामाजिक विषमतेसह आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे,’ याकडेही आढाव यांनी लक्ष वेधले.