आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. उमाकांत वाळवेकर यांना तीन महिने शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दक्षिण सदर बझार येथील डॉ. उमाकांत वाळवेकर यांच्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा 2003 अन्वये फलक न लावणे व करण्यात आलेल्या चाचण्यांचे रेकॉर्ड न ठेवल्याबद्दल न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.
सोनोग्राफी मशीन ठेवण्याची व त्यासाठी आलेल्या तपासणीच्या रुग्णांची नियमात राहून तपासणी करताना संबंधित रुग्णांच्या नावांची नोंदबुकात नोंद करणे, गर्भलिंग निदान नियमानुसार गर्भाची तपासणी केल्यावर संबंधितास गर्भाचे लिंग न सांगणे, तशा आशयाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनस्थळी लावणे आवश्यक आहे. याबाबतीत महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी 18 एप्रिल 2007 रोजी पाहणी केली असता या गोष्टींची पूर्तता नसल्याचे दिसून आले. म्हणून डॉ. आडके यांनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याकडे फिर्याद केली होती. त्यावर सुनावणी होऊन डॉ. वाळवेकर यांना एक वर्ष सक्तमजुरीचे आदेश देण्यात आले होते. त्यावर सेशन कोर्टात अपिल केले असता न्यायदंडाधिकारी पाटील यांनी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली व वाळवेकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकारतर्फे डॉ. इनायतअली शेख यांनी काम पाहिले तर जगदीश परदेशी आरोपीचे वकील होते.
संबंधितास गर्भाचे लिंग न सांगणे, तशा आशयाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनस्थळी लावणे आवश्यक आहे. याबाबतीत महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी 18 एप्रिल 2007 रोजी पाहणी केली असता या गोष्टींची पूर्तता नसल्याचे दिसून आले. म्हणून डॉ. आडके यांनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याकडे फिर्याद केली होती. त्यावर सुनावणी होऊन डॉ. वाळवेकर यांना एक वर्ष सक्तमजुरीचे आदेश देण्यात आले होते. त्यावर सेशन कोर्टात अपिल केले असता न्यायदंडाधिकारी पाटील यांनी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली व वाळवेकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकारतर्फे डॉ. इनायतअली शेख यांनी काम पाहिले तर जगदीश परदेशी आरोपीचे वकील होते.