आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक हैराण: काम 12 कोटींचे; अदा केले 32 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मनपाने हाती घेतलेल्या ड्रेनेजलाइनचे काम संबंधित मक्तेदाराने फेब्रुवारी अखेर 110 कोटी रुपयांपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एजन्सीचे काम संथगतीने आहे. 110 कोटी रुपयांच्या तुलनेत 12 कोटींचे काम पूर्ण झाल्याने कराराप्रमाणे दररोज दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असलेल्या जीवन प्राधिकरणाने केली आहे. कामाच्या संथगतीमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडते आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत शहरात 212 कोटी रुपयांचे ड्रेनेज लाइनचे (भुयारी गटार योजना) काम सुरू आहे. या कामाचा मक्ता एस.एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व घारपुरे इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ठाणे यांना देण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी 2012 रोजी वर्क ऑर्डर दिल्यानंतर फेब्रुवारी 2013 अखेर 110 कोटींचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

फेब्रुवारी अखेरपर्यंत 12 कोटी रुपयांचे कामे झाले आहे. कामाच्या संथगतीबद्दल असमाधानकारक काम असल्याचा ठपका अहवाल प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठेवला आहे. विशेष म्हणजे 12 कोटींचे काम झाल्याचे म्हटले असले तरी 32 कोटी 22 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. कामाची गती आणि झालेल्या कामाच्या ठिकाणी रस्ते पाहता नागरिक हैराण झाले आहेत.

केलेला दंड
11 सप्टेंबर 2012 पासून रोज 2500 रुपये
30 नोव्हेंबर 2012 पासून रोज 10 हजार
> 46.50 किलोमीटर पाइप उपलब्ध
> सीटेक बेसीनचे खोदाई काम पूर्ण, 10} स्थापत्य काम
> 12 कोटी रुपयांचे काम पूर्ण
> 0.5 किलोमीटर आरसीसी पाइपलाइन काम पूर्ण
> 18 किलोमीटर आरसीसी पाइपलाइन काम पूर्ण
> 12 किलोमीटर आरसीसी पाइपलाइन काम पूर्ण
> मंजुरीसाठी सादर
> देगाव येथे 75 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्राचे
> जुन्या गावठाणमध्ये 25 किमी आरसीसी लाइन टाकणे
> आतापर्यत सुमारे 110 किमी पाइप पुरवठा होणे अपेक्षित
> 110 कोटी रुपयांचे काम पूर्ण होणे अपेक्षित
> नेहरूनगर, विजापूर रोड परिसरात 36 किमी आरसीसी पाइप टाकणे आवश्यक.
> मजरेवाडी, कुमठे परिसरात 40 किमी आरसीसी
> शेळगी नाल्यावर बंधारा बांधणे पाइप टाकणे आवश्यक


38 किमीचे काम पूर्ण
"ड्रेनेजचे 20 ठिकाणी काम सुरू आहे. त्यापैकी 60 किमी लांबीचे पाइप आमच्याकडे उपलब्ध आहेत. 38 किमी. ड्रेनेजची पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. देगाव येथील मलनिस्सारण केंद्राचे काम प्रगतिपथावर असून, नोव्हेंबर अखेर संपेल.’’
-सचिन शहा, एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर

नागरिक हैराण
ड्रेनेजलाइनचे काम झालेल्या भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कामास गती नाही. केलेल्या कामावर डांबरीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना धुळीतून जावे लागते. खोदलेले रस्ते पूर्ववत करायला हवे, पण त्यांनी केले नाही.’’
-मोहिनी पत्की, नगरसेविका

ड्रेनेजलाइन कामाची गती मंद आहे. त्यामुळे यापूर्वी संबंधित मक्तेदारास दोन वेळा नोटीस देऊन दंड आकारणी सुरू केली आहे. दंडाची रक्कम मक्तेदारांच्या बिलातून वसूल करण्यात येत आहे. तरीही कामात प्रगती नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ करण्याची नोटीस बुधवारी देण्यात आली. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त अजय सावरीकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’’
-बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महानगरपालिका

या भागात काम सुरू
नम्रता सोसायटी, अनुपमा पार्क, कित्तुर चन्नम्मानगर, र्शमसाफल्य नगर, वैष्णवीनगर, द्वारकाधीशनगर, इंडियन मॉडेल स्कूल, म्हाडा, कुमठेकर हॉस्पिटल, आयडीबीआय बँक, बनशंकरी नगर, पूनमनगर, बॉम्बे पार्क, कुमठे मेन रोड, लोकमान्यनगर, सहारा, अमन हॉटेल, कल्याणनगर, कुर्बान हुसेननगर.

मक्तेदारांस मनपाने अदा केलेली रक्कम कोटीत
जमावाजमव उचल 21.32
सप्टेंबर 2012 2.62
ऑक्टोबर 2012 1.56
नोव्हेंबर 2012 1.62
डिसेंबर 2012 3.12
जानेवारी 2013 1.98
एकूण उचल 32.22

काम पूर्ण
रोहिणीनगर, सैफुल ते मीरा पिठाची गिरणी, जानकीनगर, म्हाडा चौक ते किल्लेदार मंगल कार्यालय, राघवेंद्रनगर, ओंकार नगर.