आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकलूज - महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले आणि माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते यांची अकलूज येथे निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुप्त बैठक झाली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अंगांनी तर्क-वितर्क लावून चर्चेला ऊत आला आहे. ही बैठक राजकीय नसल्याचा निर्वाळा प्रतापसिंह मोहिते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. दरम्यान, माढा मतदारसंघ प्रतापसिंह मोहिते यांच्यासाठी उपलब्ध झाला तर त्यांना आम्ही महायुतीत घेऊ शकतो, असे स्पष्टीकरण खासदार रामदास आठवले यांनी या वेळी बोलताना दिले. खासदार रामदास आठवले यांना बैठकीला नेण्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते स्वत: अकलूजच्या शासकीय विर्शामगृहावर आले होते.
सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत सविस्तर राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस सोडून माढा लोकसभा मतदारसंघ अपक्ष लढवण्याचे आव्हान देणारे प्रतापसिंह गेल्या आठवड्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन आले होते. त्यानंतर आठ दिवसांच्या आतच आठवले यांच्याबरोबर बैठक झाल्यामुळे चर्चेला उत आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.